बीड : मोटरसायकल चोरीचं रॅकेट उघडकीस, आरोपींकडून २४ चोरीच्या मोटारसायकल जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड येथील सिरसाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं. सामान्य नागरिकांकडून तक्रारी वाढल्यानंतर शिरसाळा पोलिसांनी एक विशेष ऑपरेशन राबवत मोटारसायकल चोरीचं रॅकेट उघडकीस आणलं असून दोन आरोपींना अटकही केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी २४ चोरलेल्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

शिरसाळा पोलिसांनी तांत्रिक आणि आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. मिळालेल्या माहितीवरुन परळी आणि सिरसाळा भागात राहणारे सय्यद समीर नोमान आणि अशोक रमेश गायकवाड या दोघांचा मोटारसायकल चोरीत हात असल्याचं पोलिसांना समजलं. दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांनी चोरलेल्या २४ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

दोन्ही आरोपींनी मोटार सायकल परळी, माजलगांव, दिंदृड, वडवणी, पाथरी, गंगाखेड, उदगीर या ठिकाणावरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे यातील दोन आरोपींना आज न्यायदंडाधिकारी परळी यांच्या समोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत असून चौकशीदरम्यान आणखी काही मोटारसायकल चोरीच्या घटनाही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT