Bhalchandra Nemade : ‘आपण हराम## लोकांना निवडून देतो, त्याची…’, नेमाडेंनी फटकारलं
खोके आणि धार्मिक धुव्रीकरणाच्या राजकारणावर बोट ठेवत ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी राजकारण्यांसह सर्वसामान्य मतदारांना फटकारलं आहे. ‘फॅसिझम वाढवणं याच्यामुळे आपण मागे पडत जाऊ. हे वाढत गेलं तर आपण मागे मागे जाऊ. ते आपल्या लोकांच्या हातात आहे. त्यांचं डोकं नीट चाललं पाहिजे,’ असं म्हणत भालचंद्र नेमाडेंनी तिखट भाषेत कान टोचले आहेत. […]
ADVERTISEMENT
खोके आणि धार्मिक धुव्रीकरणाच्या राजकारणावर बोट ठेवत ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी राजकारण्यांसह सर्वसामान्य मतदारांना फटकारलं आहे. ‘फॅसिझम वाढवणं याच्यामुळे आपण मागे पडत जाऊ. हे वाढत गेलं तर आपण मागे मागे जाऊ. ते आपल्या लोकांच्या हातात आहे. त्यांचं डोकं नीट चाललं पाहिजे,’ असं म्हणत भालचंद्र नेमाडेंनी तिखट भाषेत कान टोचले आहेत.
ADVERTISEMENT
जळगावातील जैन हिल्स येथे जैन समूहाच्या वतीने साहित्य कला पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यानंतर भालचंद्र नेमाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, “आता आपल्या हातात आहे की, आपण कुणाला निवडून देतो. आपण हराम## लोकांना निवडून देतो, त्याची ही फळं आहेत. आपल्याला कळत नाही का कोण चांगलं आहे ते. म्हणजे चांगल्या लोकांनी पडूच नये यात असं झालंय सगळं,” अशा शब्दात भालचंद्र नेमाडेंनी आपला संताप व्यक्त केला.
हे वाचलं का?
भालचंद्र नेमाडेंनी ‘खोके’च्या मुद्द्यावर ठेवलं बोट
“खोक्यांची भाषा आपल्यासारख्यांना चालते का? आपल्याला उद्याची काळजी असते काय खावं काय नाही. आपल्या अर्ध्या लोकांना अन्न मिळत नाही. 60 टक्के लोक आपल्याकडे अपुऱ्या पोटी जेवतात. व्यवस्थित मिळत नाही. फार तर 10 ते 15 टक्के लोकांचं नीट चाललंय. अशा लोकांनी कुणाला निवडून द्यावं. हे तर लोकांना कळलं पाहिजे ना? काय उपयोग त्या लोकशाहीचा. कुणाला मत देतोय, हे कळल्याशिवाय कशी काय सुधारणा होणार आहे,” अशा शब्दात त्यांनी मतदारांचेही कान टोचले.
फॅसिझम, धार्मिक धव्रीकरणाच्या मुद्द्यावर भालचंद्र नेमाडे काय म्हणाले?
“लोक जर असेच मुर्ख राहिले, तर सरकार असंच येत राहणार. आपल्याला लोकांनाच कळलं पाहिजे की कोण चांगलं आहे. कोण वाईट आहे. कोणत्या पार्टीचं काय आहे. आपल्या देशात सर्व जातीचे लोक आहेत. मुस्लिमांपासून सगळ्यांनी वर आणलेलं आहे. म्हणजे उपनिषदाची भाषांतर अकबर करायचा,” असं नेमाडे म्हणाले.
ADVERTISEMENT
“तुकाराम महाराजांचे गुरू सुफी होते, हैदराबादचे. संत एकनाथांचे गुरू मुस्लिम होते. आपण सगळे एकत्र आहोत. यात काही फरक नाहीये. फॅसिझम वाढवणं याच्यामुळे आपण मागे पडत जाऊ. हे वाढत गेलं तर आपण मागे मागे जाऊ. ते आपल्या लोकांच्या हातात आहे. त्यांचं डोकं नीट चाललं पाहिजे,” असं म्हणत भालचंद्र नेमाडेंनी सद्य राजकीय स्थितीवर भाष्य केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT