भरत गोगावलेंनी थेट उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य; ‘तेव्हाच शिवसेना भवनात बसले असते, तर…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून योगेश कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनंत गिते यांच्यावर टीकेचे बाण डागले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवरही भरत गोगावलेंनी निशाणा साधला.

ADVERTISEMENT

भरत गोगावले म्हणाले, ‘सत्तेत असलेल्या पक्षातील १ आमदार नाराज होऊ शकतो. १० ते १५ नाराज होऊ शकतात, पण ४० आमदार नाराज होऊ शकतात? १८ पैकी १४ नाराज होऊ शकतात? अपक्षांपैकी १० आमदार आमच्यासोबत येऊ शकतात. नगरसेवकांपासून ते जिल्हाप्रमुखांपर्यंत अनेक जण आमच्यासोबत येत आहेत. ते असेच आलेत का?’, असा सवाल भरत गोगावलेंनी उपस्थित केला.

‘१९६६ ला बाळासाहेब ठाकरेंनी हे रोपटं लावलं होतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे रोपटं सुकायला लागलं होतं. एकनाथ शिंदे यांनी हे रोपटं पुन्हा पुर्नजीवित करण्याचं काम केलं. भाईंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. वर्षा बंगला सोडला, मुख्यमंत्री पद सोडलं, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला काही सोडलं नाही’, असं म्हणत गोगावलेंनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

हे वाचलं का?

पवार कंपनी शिवसेना संपवायला निघाले -भरत गोगावले

‘अजित पवार आणि पवार कंपनी शिवसेना संपवायला निघाले. आमचे मुख्यमंत्री तरीही आमच्या आमदारांना पाच कोटी आणि त्यांच्या (राष्ट्रवादी) आमदारांना दहा कोटी. पडलेल्या आमदारांना एक रुपयाही दिला नाही. पराभूत झालेल्या आमदारांना एक रुपयाही दिला असेल, तर सांगा आम्ही या सभेसमोर नतमस्तक होऊ’, असं सांगत गोगावलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला.

‘त्यांच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) पडलेल्या आमदारांना पाच ते दहा कोटींचा निधी. त्यांच्या जिल्हाप्रमुखांना निधी. त्यांचं मिशन काय तर १०० आमदार निवडून आणायचे. महाविकास आघाडी झाली. दापोलीपासून ते अलिबागपर्यंत आमच्याच मतदारसंघात आम्हाला संपवता. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत’, असं उत्तर भरत गोगावलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं.

ADVERTISEMENT

अनंत गितेंना भरत गोगावलेंनी दिलं प्रत्युत्तर

‘आम्ही येरे गबाळे नव्हेत. माजी खासदार म्हणाले की, शरद पवार आमचे गुरू होऊ शकतात का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमच्यासोबत कधीही येऊ शकत नाही असं कोण म्हणालं होतं. अनंत गिते म्हणाले. दोन वर्षे घरात बसले आणि आता गिते साहेबांना मातोश्रीचे दरवाजे बंद झाले. आम्हाला आदेश दिले की, गितेंना आमंत्रण द्यायचं नाही, फोटो लावायचा नाही. ही वस्तुस्थिती आहे’, असं सांगत भरत गोगावले यांनी अनंत गिते आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.

ADVERTISEMENT

‘त्यांची स्टाईल आहे की मुठी आवळा आणि हात वर करा. आम्ही मुठी आवळत नाही. मुठीने ठोश्या देतो. जो आमच्या नादाला लागतो, त्याला आम्ही ठोश्या देतो. सहा वेळा आम्ही निवडून दिलं होतं, मग का पडले? केंद्रात मंत्री होते, किती लोकांना रोजगार दिले? ते अवजड होते आणि अवजड झाले’, अशी टीका भरत गोगावले यांनी माजी खासदार अनंत गिते यांच्यावर केली.

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण, एकनाथ शिंदेंवर उधळली स्तुतीसुमनं

‘आदित्य ठाकरे आज बाहेर पडलेत. त्यावेळी बाहेर पडले असते, तर ही वेळ आली नसती. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, एक दिवसाआड मी शिवसेना भवनात बसेन. जर अडीच वर्षात शिवसेना भवनात बसले असते, तर ही आमची अवस्था झाली नसती. रामदास कदमांसारखे नेते आमच्यासारख्या आमदारांना भेटी मिळत नव्हत्या. शिवसैनिकांची काय अवस्था? आता रात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तु्म्हाला भेट नाही दिली, तर आम्हाला विचारा. हा फरक आहे’, असं आमदार भरत गोगावले म्हणाले.

‘कोकणात चक्रीवादळं आली. पालकमंत्री शिवसेनेचे होते. काय आणलं? एकनाथ शिंदे आले, तेव्हा सहा ट्रक सामान घेऊन आले होते. हा फरक आहे. महाडला पूर आला, तेव्हा कुणी मदत केली. चिपळूणच्या जनतेला विचारा’, असं म्हणत भरत गोगावलेंनी आमदार भास्कर जाधवांवरही टीकास्त्र डागलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT