Nagpur च्या RSS मुख्यालयाजवळ काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले
नागपूरच्या संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर येऊन आपापसात भिडले. स्थानिक काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई, बेरोजगारी विरोधात काढलेली बाईक रॅली संघ मुख्यालयाजवळून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न केला. मात्र काँग्रेस कार्यकर्ते त्या अरुंद गल्लीतून रॅली नेण्यावर अडून राहिल्यामुळे […]
ADVERTISEMENT
नागपूरच्या संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर येऊन आपापसात भिडले. स्थानिक काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई, बेरोजगारी विरोधात काढलेली बाईक रॅली संघ मुख्यालयाजवळून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
मात्र काँग्रेस कार्यकर्ते त्या अरुंद गल्लीतून रॅली नेण्यावर अडून राहिल्यामुळे तिथे तणाव निर्माण होऊन शाब्दिक वादावादी व धक्काबुक्की झाली. खरं तर विशेष सुरक्षा व्यवस्था असलेल्या या परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्यानंतर पोलीस ही तिथे पोहोचले. त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मागे हटवण्यात आलं
काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई व अन्य केंद्र सरकारविरोधी मुद्द्यांवर एक रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध दर्शवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला व दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते भिडले असं सांगण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
तर, परिस्थितीचं गांभीर्य पाहून घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला आणि पोलिसांची जादा कुमकही मागवली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून मागे जावं लागलं. असं देखील सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT