OBC Reservation : ‘शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे हे झारीतले शुक्राचार्य’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. डिसेंबर 2022 पर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचं नाही असा महाविकास आघाडी सरकारला प्लान आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे झारीतले शुक्राचार्य आहेत अशी टीका महाराष्ट्राचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत हा गंभीर आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक सोमवारी पार पडली. त्यात ओबीसींच्या हक्कांसाठी जागर करण्याचं आवाहन राज्यातील नेत्यांनी केलं. आता भाजपने या प्रकरणी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. डिसेंबर 2022 पर्यंत या सरकारला ओबीसींचं राजकीय आरक्षण द्यायचंच नाही त्यामुळेच ते न देण्याचा कट रचला जातो आहे असं चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले बावनकुळे?

हे वाचलं का?

ओबीसींना मिळालेलं 27 टक्के आरक्षण टिकण्यासाठी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता. आम्ही हायकोर्टात योग्य मांडणी केल्याने कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला. याविरोधात काँग्रेसचे नेते सुप्रीम कोर्टात गेले. 31 जुलै 2019 ला याआधी असलेल्या फडणवीस सरकारने अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण टिकवलं. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा अध्यादेश लॅप्स झाला. सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारने बाजूच मांडी नाही. राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करावा असे निर्देश न्यायलयाने दिले होते. तरीही विधीमंडळाचा गैरवापर करून हा डेटा केंद्राने द्यावा हा ठराव करण्यात आला. मात्र केंद्राचा काहीही संबंध नाही असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं विजय वडेट्टीवार बोलतात. छगन भुजबळ मोर्चे काढतात, पण मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार बोलत नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातील आकडेवारीत 69 लाख चुका आहेत. हा डेटा राज्य सरकारनं नव्यानं तयार करावा. छगन भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा, भाजप त्यांना नक्की मदत करेल,’ असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांची खरमरीत टीका

ADVERTISEMENT

ठाकरे सरकारमध्ये नेते कमी ओबीसींच्या प्रश्नांवर बोलणारे पोपट जास्त आहेत अशी खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ओबीसींचा खरा पक्ष हा भाजपच आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. ओबीसींना मंत्रिमंडळात स्थान देण्याचं काम मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत झालेल्या भाषणात त्यांनी ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून कडाडून टीका केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT