एकनाथ खडसे अमित शाहंच्या कार्यालयाबाहेर 3 तास थांबून होते : गिरीश महाजन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगाव : भाजपमधून येऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरस्थावर झालेले आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अशाच राज्यातील भाजपचे बडे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दोन मोठे गौप्यस्फोट करत या चर्चांना आणखी हवा दिली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

ADVERTISEMENT

तीन तास थांबूनही खडसे-शाहंची भेट झाली नाही :

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी त्यांना तब्बल 3 तास थांबावे लागले होते. त्यानंतरही त्यांची भेट झाली नव्हती. मला तेव्हा तिथून फोन आला की इथे रक्षाताई आणि एकनाथ खडसे आले आहेत. तेव्हा मी रक्षाताईंनाच फोन लावला आणि त्यांच्याकडूनच माहिती घेतली. ते 3 तास थांबले पण भेट झाली नाही, हे मला निश्चित माहिती आहे.

‘एकदा आपण बसू अन् मिटवून टाकू’

काही दिवसांपूर्वी नाशिकमधील अखिल भारतीय महानुभाव संमेलन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, एकनाथ खडसे एकाच मंचावर आले होते. परंतु कार्यक्रमात खडसे भाजप पदाधिकाऱ्यांपासून लांब बसल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगितलं होतं. यामुळे नेमके खडसे यांनी फडणवीस यांच्या कानात काय सांगितलं असेल? याबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या.

हे वाचलं का?

अखेर महाजन यांनी स्वतः खडसे काय बोलले होते याबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, भाषण झाल्यावर खडसे माझ्याजवळ आले आणि म्हणाले, एकदा आपण बसू, मिटवून टाका, जाऊद्या. त्यावर पत्रकारांनी खडसे यांना नेमकं काय मिटवायचं आहे असा सवाल महाजनांना केला. तेव्हा ते म्हणाले, त्यांचं सध्या जे काय चाललंय त्यावरून त्यांचं काय मिटवायचं होतं ते गर्दी आणि गोंधळामुळे विचारता आलं नाही. पण आता बसल्यावर त्यांच्या मनात काय मिटवायचं आहे ते माहित नाही.

अमित शाहंच्या भेटीवर काय म्हणाले रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे?

अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीवर काही दिवसांपूर्वी स्वतः एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनीही खुलासा केला होता. एकनाथ खडसे म्हणाले होते, अमित शाहनांच काय तर देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. तर रक्षा खडसे म्हणाल्या, मी आणि एकनाथ खडसे अमित शाहंची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलो होतो. पण कार्यक्रम व्यस्ततेमुळे भेट होऊ शकली नाही. मात्र फोनवर अमित शाह आणि एकनाथ खडसे यांचे बोलणे झाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT