बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार?-किरीट सोमय्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

ADVERTISEMENT

शिवसेना खासदार संजय राऊत यांना मी माझ्या पायतला जोडा देतो. माझ्या पायातले दोन्ही जोडे देतो. जर मी खोटं बोलत असेन तर खुशाल मला जोडे मारा असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी सांगितलं की प्रताप सरनाईक हे मी आरटीआय करत होतो तेव्हा माझ्या बाजूला येऊन बसले. त्याचे सगळे फोटो त्यांनीच काढले आणि व्हायरल केले. माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत मी मंत्रालयात गेलो होतो असंही सोमय्यांनी सांगितलं. तसंच रश्मी ठाकरेंनी आणि मनिषा वायकर यांनी जर बंगल्यांचा टॅक्स भरला नसेल तर खुशाल मला जोडे मारा असंही सोमय्या म्हणाले.

मुलुंडच्या ‘त्या’ दलालाला जोड्याने मारू; संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले

हे वाचलं का?

संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले. 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले.

यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधीमी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला, मुख्यमंत्री तुमच्याशी खोटं बोलले का? असंही त्यांनी संजय राऊत यांना विचारलं आहे.

ADVERTISEMENT

माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा संजय राऊत यांचे घोटाळे बाहेर काढणारच-किरीट सोमय्या

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले सोमय्या?

कोव्हिड घोटाळ्याबाबत संजय राऊत एक शब्दही का बोलले नाहीत? 19 बंगल्यांच्या संदर्भात रश्मी ठाकरेंनी ग्रामपंचायतीची माफी मागितली हे त्यांनी का सांगितलं नाही? असे प्रश्न उपस्थित करत किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना प्रतिआव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा मी घाबरणार नाही. संजय राऊत यांचे घोटाळे बाहेर काढणारच असं प्रतिआव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे. तसंच माझ्यावर केलेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT