सचिन वाझेंनी IPL बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितली – नितेश राणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NIA च्या कस्टडीत असलेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंविरोधात भाजप आमदार नितेश राणे यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आयपीएलमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या बुकींसोबत वाझे यांचे संबंध असून त्यांनी बुकींकडे १५० कोटींची खंडणी मागितल्याचं नितेश राणे म्हणाले. ते भाजपच्या मुंबई कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने वाझेंना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

अँटेलिया कार प्रकरण भोवलं, Sachin Vaze पोलीस दलातून निलंबित

सचिन वाझे आणि शिवसेनेचं कनेक्शन अधोरिखीत करत भाजप गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेला आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना नितेश राणेंनी गंभीर आरोप केले. “गेल्या वर्षी सप्टेंबर तो नोव्हेंबरच्या काळात आयपीएल स्पर्धा खेळवली जाते. ही स्पर्धा तरुणांसाठी सुरु केली होती. पण मग इथे बेटींग सुरु झालं. मुंबईत अनेक ठिकाणी मॅचवर सट्टे लावण्याचं काम चालतं. सचिन वाझेंनी या बुकींना फोन करुन तुम्ही कुठे सट्टा लावत आहात, तुमचं लोकेशन कुठे आहे हे आम्हाला सर्व माहिती आहे. जर अटक करुन घ्यायची नसेल तर १५० कोटी द्या नाहीतर मी तुमच्या अड्ड्यांवर छापेमारी करीन. अशा पद्धतीने सचिन वाझे बुकींकडून खंडणी मागत होते.”

हे वाचलं का?

यावेळी बोलत असताना नितेश राणे यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात संभाषण झाल्याचं सांगितलं. वाझेंनी बुकींना फोन केल्यानंतर सरदेसाईने वाझेंना फोन करुन तुम्ही मागितलेल्या पैशांपैकी आमचा वाटा किती?? अशी विचारणा केल्याचं नितेश राणेंनी सांगितलं. या सर्व संभाषणांचे डिटेल्स NIA ने जाहीर करावे अशी मागणी राणे यांनी केली आहे. सध्या २५ मार्चपर्यंत सचिन वाझे NIA कस्टडीत आहे. दरम्यान भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही रविवारी वाझे प्रकरणावरुन शिवसेनेला चांगलेच खडे बोल सुनावले होते.

‘याच’ CCTV फुटेजनंतर NIA ने केली सचिन वाझेंना अटक, पाहा नवं फुटेज

ADVERTISEMENT

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. NIA ने दहशतवादी कटात अटक केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला मुख्यमंत्री कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही लाजीरवाणी बाब आहे. अशा कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे असं त्यांना वाटत नाही का?? असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज सचिन वाझे प्रकरणावरुन राज्य सरकारला टोला लगावला आहे. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी आता तर नुसती सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा एक भाग समोर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे असं सांगितलं. दुर्दैवाने राज्य सरकारच्या वतीने आतापर्यंत वाझे यांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं. ते ओसामा बिन लादेन आहेत का वगैरे प्रश्न विचारुन त्यांची वकिली करण्याचं काम सरकारने केलं. पण NIA ने तपास हाती घेतल्यानंतर आता त्यांना यामध्ये महत्वाचे पुरावे मिळत आहेत. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणीही काही महत्वाचे धागेदोरे आणि पुरावे केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हे प्रकरण सचिन वाझेंपुरतं मर्यादीत नाही. त्यांना कोणी पाठींबा दिला, यामागे कोण आहे हे देखील आगामी काळात पुढे येईल.

सचिन वाझेंना अटक, शरद पवार म्हणतात…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT