सरकारने आरक्षणापेक्षा मतांच्या राजकारणाला महत्व दिलं – शिवेंद्रराजे संतापले
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्य सरकार न्यायालयात आरक्षण टिकवू शकलं नाही असा सूर विरोधी पक्षाने लावला आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत सरकारने आरक्षणापेक्षा मतांच्या राजकारणाला महत्व दिलं असं म्हणलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे […]
ADVERTISEMENT
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्य सरकार न्यायालयात आरक्षण टिकवू शकलं नाही असा सूर विरोधी पक्षाने लावला आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत सरकारने आरक्षणापेक्षा मतांच्या राजकारणाला महत्व दिलं असं म्हणलं आहे.
ADVERTISEMENT
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजावर पुन्हा अन्यायच झाला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने अभूतपूर्व लढा ऊभा केला…मात्र आरक्षण टीकवण्यात राज्य सरकार कमी पडलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हायकोर्टात आरक्षण टिकलं होतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही आरक्षण टीकेल अशी आशा होती. परंतू सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडलं. मराठा समाजाच्या गरजेपेक्षा, आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारण, मी पणा, अंतर्गत कुरघोड्या यांना सरकारने जास्त प्राधान्य दिलं.” शिवेंद्रराजे साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
सरकारमधला प्रत्येक मंत्री वेगळी भूमिका मांडत राहिला. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर एकी झाली नाही याचे गंभीर परिणाम आता आपल्याला भोगावे लागत आहेत. आरक्षणापेक्षा मतांच्या राजकारणाला सरकारने अधिक महत्व दिलं. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय कष्टकरी मराठा समाजासाठी दुर्दैवी आणि अन्यायकारक असल्याचंही शिवेंद्रराजेंनी म्हटलंय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT