पावसात भिजलेलं सरपण फक्त धूर करतं, जाळ नाही ! गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
पश्चिम बंगालमध्ये विजयाची आस लावून बसलेल्या भाजपच्या पदरात निराशा पडली असली तरीही राज्यात भाजपने कमाल करुन दाखवली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत भाजप आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीच्या भागीरथ भालकेंचा पराभव केला. या पराभवानंतर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे. पावसात भिजलेलं सरपण फक्त धूर करतं, जाळ नाही. […]
ADVERTISEMENT
पश्चिम बंगालमध्ये विजयाची आस लावून बसलेल्या भाजपच्या पदरात निराशा पडली असली तरीही राज्यात भाजपने कमाल करुन दाखवली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत भाजप आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीच्या भागीरथ भालकेंचा पराभव केला. या पराभवानंतर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
पावसात भिजलेलं सरपण फक्त धूर करतं, जाळ नाही. आता सांगा कोणी केला करेक्ट कार्यक्रम?? काही महिन्यांपूर्वी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीत श्रीनीवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी भर पावसात सभा घेतली होती. याचा दाखला देत पडळकरांनी टीका केली आहे.
Pandharpur By-election Result:
पंढरपुरात भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’, समाधान आवताडेंचा निर्णायक विजय
हे वाचलं का?
पंढरपूरमध्ये आपला उमेदवार निवडणून आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न केले. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पंढरपूरात भालके यांच्यासाठी सभा घेतल्या. या प्रचारसभांमध्ये शरद पवार यांनी पडळकरांवर टीका देखील केली होती.
दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालच्या निकालांवरुन ममता बॅनर्जींचं कौतुक करणाऱ्या राज्यातल्या नेत्यांना टोला लगावला आहे. “बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना हे मी आतापर्यंत ऐकलं होतं पण आता पाहतो ही आहे. आज मी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिक्रिया पाहतो आहे. दुसऱ्यांच्या घरी मुल जन्माला आल्यानंतर इतकी मिठाई वाटत आहेत इतके ढोल वाजवत आहेत…की बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना हे आजपर्यंत ऐकलं होतं पण आज पहायलाही मिळालं.”
ADVERTISEMENT
खरंतर काँग्रेसची अवस्था काय झाली हे आपण पाहिलं, शिवसेनेचं तर काही अस्तित्वच नाहीये…राष्ट्रवादी आजच पंढरपूरमध्ये हरली आहे. पण ममता बॅनर्जींचा विजय हा जणू काही आपलाच विजय आहे असं दाखवलं जातंय, हा अविर्भाव सर्वांनाच समजतो. बंगालच्या निवडणूकीमुळे एक गोष्ट चांगली झाली की इव्हीएमबद्दल आता कोणी बोलणार नाही, असा उपरोधित टोला फडणवीसांनी लगावला.
ADVERTISEMENT
West Bengal Election Counting : भाजपच्या गद्दारीला लोकांनी चपराक दिली आहे – शिवसेना
ज्या राज्यात आमचं अस्तित्वच नव्हतं. मागच्या वेळी जिकडे आमच्या ३ जागा आल्या होत्या तिकडे आम्ही चॅलेंजर म्हणून उभे राहिलो. ममता बॅनर्जींचीही दमछाक झाली आहे. यापूर्वी पश्चिम हंगाल हे काँग्रेस आणि डाव्या विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जायचं तिकडे आता हिंदूत्व आणि भगव्याचा बोलबाला सुरु झाला आहे, असं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.
संजय राऊत म्हणतात दीदी ओ दीदी…पवारांनीही दिल्या शुभेच्छा, राज्यातील नेत्यांकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT