ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला तर 25 लाख देणार : खासदार बोंडेंची जाहीर ऑफर
अमरावती : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अर्ज भरल्यानंतर आता प्रचाराची लगबग सुरु झाली आहे. प्रचारादरम्यान प्रत्येक पक्ष, उमेदवार भविष्यात काय काय काम करणार यासाठी वेगवेगळी आश्वासन देत आहेत, वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. आपलं नाव आणि निशाणी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हटके कल्पना राबवत आहेत. अशात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी ग्रामपंचायतीवर भाजपचा भगवा फडकला […]
ADVERTISEMENT
अमरावती : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अर्ज भरल्यानंतर आता प्रचाराची लगबग सुरु झाली आहे. प्रचारादरम्यान प्रत्येक पक्ष, उमेदवार भविष्यात काय काय काम करणार यासाठी वेगवेगळी आश्वासन देत आहेत, वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. आपलं नाव आणि निशाणी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हटके कल्पना राबवत आहेत.
ADVERTISEMENT
अशात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी ग्रामपंचायतीवर भाजपचा भगवा फडकला तर गावाला २५ लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं आहे. बोंडे यांनी रविवारी संध्याकाळी याची घोषणा केली. ते वरुड येथे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकारतर्फे आयोजित “लोक कला यात्रा २०२२” महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
या घोषणेचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवरती देखील अपलोड केला आहे.
हे वाचलं का?
यावेळी बोलताना अनिल बोंडे म्हणाले, तीन वर्षांमध्ये गावा-गावातील रस्ते खराब झाले. पण आता दिल्लीत नरेंद्र मोदी आहेत. मुंबईत देवेंद्र फडणवीस आहेत. आता आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीवर भाजपचा भगवा फडकला तर प्रत्येक गावाला मी २५ लाख रुपयांचा निधी देणार. माझ्या २५-१५ च्या निधीमधून खासदार निधीमधून मी हा निधी देणार, असल्याचही बोंडे यांनी यावेळी जाहीर केलं.
राज्यात जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या 2053 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 34 जिल्ह्यांमधील 340 तालुक्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT