काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच काढायला लावल्या उठाबशा
चंद्रपूर: भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर उठबशा काढायला लावल्याचं समोर आलं आहे. याचा व्हीडिओ देखील आता समोर आला आहे. राकेश कुर्झेकर या काँग्रेस कार्यकर्त्याने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर टाकली होती त्यात शिविगाळ केल्याचं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. राकेश कुर्झेकर याने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी थेट ब्रम्हपुरी पोलीस […]
ADVERTISEMENT
चंद्रपूर: भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर उठबशा काढायला लावल्याचं समोर आलं आहे. याचा व्हीडिओ देखील आता समोर आला आहे. राकेश कुर्झेकर या काँग्रेस कार्यकर्त्याने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर टाकली होती त्यात शिविगाळ केल्याचं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
राकेश कुर्झेकर याने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी थेट ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर राकेश कुर्झेकर याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याला माफी मागायला लावली व उठबशा देखील काढायला लावल्या.
दरम्यान, कुर्झेकर याने माफी मागितल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली नाही.
हे वाचलं का?
‘कोरोना लाटेत काँग्रेसवाल्यांनी फक्त 500-1000 लोकांनाच फ्री तिकिटं दिली, पण…’, पाहा PM मोदी काय म्हणाले
काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT
देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याविरोधात काँग्रेसनं राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्याने याच मुद्द्यावरुन आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामध्ये शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला होता. त्यामुळेच भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनात धाव घेतली होती.
ADVERTISEMENT
नागपुरात देखील भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने
दुसरीकडे नागपूरमध्ये काल देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. यावेळी मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. तसंच महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही, मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली होती.
कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र जबाबदार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असल्याचं दिसून येत आहे. त्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपुरात देखील काँग्रेस कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आंदोलनासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर आले होते. मात्र आधीपासूनच तिथे भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होती त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते असं चित्र दिसून आलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT