Uddhav Thackeray : वापर करून फेकून देणं ही भाजपची नीती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वापर करून फेकून देणं ही भाजपची नीती आहे असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी तसंच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकरालं आहे त्यावर त्यांनी भाष्य केलं.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

महत्वाकांक्षा जरूर असावी पण ती राक्षसी महत्त्वकांक्षा नसावी. जास्तीत जास्त जास्त काय केलंय तुम्ही आमदारांना घेऊन जाताय, घेऊन जा. झाडाची फुलं नेली न्या हरकत नाही. या झाडाची मूळं माझ्यासोबत आहेत. ती आहेत तोपर्यंत मला काहीही चिंता नाही. निसर्गाचा नियम आहे की झाडाची सुकलेली पानं गळलीच पाहिजेत. सुकलेली पानं, सडलेली पानं तोडून टाकावी लागतील नाहीतर माझं झाड सडू शकतं. ज्यांना न्यायचं आहे त्यांना घेऊन जा. मी वर्षा बंगला सोडला तेव्हा मला वाईट वाटलं नाही.

हे वाचलं का?

शिवसेना जे सोडून गेले ते माझे नव्हतेच, मग मला कशाला वाईट वाटेल. मी लोकांची सेवा करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी आहे. कुणाची स्वप्नं मोठी झाली आहेत ती पूर्ण करण्यासाठी बसलेलो नाही. भाजपसोबत गेलं पाहिजे असं मला त्यांनी (एकनाथ शिंदे) सांगितलं होतं. मी म्हटलं ज्यांनी मातोश्रीचा अपमान केला, आपल्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जायचं का?

वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. तुम्ही त्यांच्यासोबत आज आहात काहीतरी फायदा होईल पण नंतर काय?काम झालं की ते तुम्हाला फेकून देतील. नाही म्हटलं तरीही ते आपण सहन करत आलो आहे. आत्तापर्यंत अनेकदा त्यांनी हेच केलंय. आपलीच माणसं फोडायची मग ती आपल्यावर सोडायची हे प्रकार सुरू आहेत. तुम्ही लढत राहा, आम्ही चरत राहू. आधी राणेला आपल्या अंगावर सोडलं होतं, आता यांना सोडलं आहे. उद्या काही कारवाई झाली तर ती आपल्यातून फुटून गेलेल्यांवर होते. बाकीचे सगळे नामानिराळे.

ADVERTISEMENT

असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. यांचं नुकसान काहीही होत नाही. बाहेरचे भाडोत्री लोक घ्यायचे, काही झालं तर त्या भाडोत्री माणसाचं होईल ही यांची नीती आहे. मी काय कमी केलं होतं? ज्या वेळी जे चांगलं ते मी ते दिलं. आत्तापर्यंत गेल्या पाच वर्षात मोठं खातं दिलं. साधारणतः तुम्ही इतिहास काढून बघा नगरविकास खातं कुणाकडे गेलंय का? ते मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवलंय आत्तापर्यंत. मी तेपण दिलं. संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांनाही सांभाळून घेतलं गेलं. मात्र आता हे सगळे गेलेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच लढा देणारच असंही म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ठाकरे आणि शिवसेना या दोन नावांशिवाय जगून दाखवा असं आव्हान आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा चौथा दिवस आहे. उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत.

याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आम्ही बाळासाहेब ठाकरे-आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना पुढे नेत आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. अशात शिवसेना भवनावर आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसंह सोबत गेलेल्या आमदारांना आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT