बीकेसीमध्ये गल्ल्या आणि फुटपाथच नूतनीकरण होणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तक: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यात येणार आहे. या परिसरात झालेल्या ट्रॅफीक सर्व्हेसनुसार इथली जागा आणि त्याचा वापर करणारी माणसं हे प्रमाण व्यस्त असल्याचं आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. बीकेसी परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनमुळे या भागात भविष्यात वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आल्याचे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

आंतरराष्ट्रीय बीकेसीमध्ये आता पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येत आहे. बीकेसीतून जाणाऱ्या मेट्रो लाईनमुळे या सुधारणा करण्यात येणार आहेत.

बीकेसी परिसरात झालेल्या ट्रॅफिक सर्व्हेनुसार असलेली जागा आणि त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्ती यांचं प्रमाण व्यस्त असल्याचं आढळलं आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरीटीने (एमएमरडीए) एका आंतरराष्ट्रीय कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. ही कंपनी शहर रचना, सुविधा, जागा इत्यादीचा विचार करुन त्यानुसार सुधारणा करण्यावर भर देणार आहे.

हे वाचलं का?

बीकेसी परिसरातील जी ब्लॉक भागात तिथली ट्रॅफिक जंक्शन्स आणि आतल्या गल्ल्यांमध्ये यादृष्टीने बदल करण्यात येणार आहेत. यावेळी त्या भागात असणाऱ्या झाडांना दुखापत होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आले आहे.

बीकेसीमधून जाणाऱ्या मेट्रो लाईनमुळे या भागातील पादचाऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबरच बाईक शेअरिंगचा उपक्रम एमएमआरडीएतर्फे राबविण्यात आल्यामुळे त्याकडे लोकांचा ओढा वाढत आहे. यासाठी बीकेसी परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुलभूत सुविधांची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने या भागात सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT