तुमची इमारत अतिधोकादायक आहे का… कसं ओळखाल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिकेकडून अतिधोकादायक इमारतींची यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करताना महापालिकेनं इमारत अतिधोकादायक ओळखण्याबद्दलची माहितीही दिली आहे.

अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ / २२६९४७२५ / २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची हानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहावं, असं आवाहनही महानगरपालिकेनं केलं आहे.

वास्तव्यास असणारी इमारत ढोबळ मानाने अतिधोकादायक झाली आहे, याची काही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. ती कारणंही महापालिकेनं सांगितली आहेत.

इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.

इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.

इमारतीचा तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे, इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे.

इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसणे, इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे.

इमारतीचा आर.सी.सी. चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा/भेगा दिसणे.

स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.

इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.

यापैकी कोणतीही तत्सम लक्षणे दिसून येत असतील, अशा इमारतीतील नागरिकांनी आपली इमारत त्वरित रिक्त करणे आवश्यक आहे. तसेच आजुबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना देखील सतर्क राहण्याबाबत अवगत करावे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT