मुंबईतील कोविड संसर्गाचे व्यवस्थापन व आकडेवारी ही पूर्णपणे पारदर्शक !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूच्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई शहरात यंत्रणेने अवलंबलेल्या पॅटर्नचं खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र सरकारचं यासाठी कौतुक केलं परंतू राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने मात्र मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्या याची बनवाबनवी थांबवा आणि जनतेची दिशाभूल करु नका असं म्हटलं होतं. फडणवीसांनी केलेल्या या आरोपांवर महापालिकेने आपली बाजू मांडली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील कोविड संसर्गाचे व्यवस्थापन आणि आकडेवारी ही पूर्णपणे पारदर्शक आहे. कोविड चाचण्या आणि कोविड मृत्यूंच्या बाबतीत केली जाणारी कार्यवाही ही ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलंय. मुंबईत कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याबद्दल महापालिकेकडून आभासी चित्र उभं केले जात असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांमधून आणि समाजमाध्यमांमधून होत आहेत. हे आरोप पूर्णपणे निराधार असून महापालिका प्रशासन याचा इन्कार करत आहे. जागतिक आरोग्य संघटना, ICMR यांनी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच मुंबई महापालिका कोविड चाचण्या व मृत्यूची नोंद करत आहे. यामुळेच शहरातली परिस्थिती नियंत्रणात असून महापालिकेच्या मुंबई पॅटर्नचं सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी काय केले होते आरोप??

हे वाचलं का?

मुंबईतील कोरोना हा प्रशासकीय उपायांमुळे नियंत्रणात आला आहे असे आभासी चित्र निर्माण केले जाते. याबाबत वारंवार अनेक बाबी मी आपल्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र दुर्दैवाने प्रत्येकवेळी आभासी चित्र उभे करण्यासाठी अशा कठीण काळातही विविध पी आर कंपन्या आणि सेलिब्रिटी यांचा वापर केला जात आहे हे खरोखरच दुर्दैवी आहे.

कोरोनासंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागति पातळीवरची जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी एक नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोव्हिडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोव्हिड मृत्यू म्हणूनच नोंदवायचा आहे. याला अपवाद आहे तो अपघात, आत्महत्या आणि खून या कारणांमुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोग रूग्णाचा मृत्यू यांचाच आहे. फक्त असेच मृत्यू हे अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या रकान्यात नोंदवायचे आहेत. मुंबईतील मृत्यूदर कमी दाखवण्यासाठी किती भयंकर प्रकार होतो आहे हे स्पष्टपणे दिसून येते आहे. उर्वरित महाराष्ट्रात एकीकडे अन्य कारणांमुळे मृत्यू नोंदण्याचं प्रमाण हे 0.7 टक्के असताना मुंबईत मात्र कोरोनच्या दुसऱ्या लाटेदरम्यान हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे. पहिल्या लाटेही हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात 0.8 टक्के इतके होते तर मुंबईत 12 टक्के होते.

ADVERTISEMENT

महापालिकेने काय दिलंय स्पष्टीकरण?

ADVERTISEMENT

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही किंवा त्याच्याशी छेडछाड केली जात नाही. दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून कोविड मृत्युंचे आकडे जाहीर केले जातातच. कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर संकेतस्थळावर देखील त्याची नोंद असते. सरकारकडेही नियमितपणे त्याची माहिती सादर करण्यात येते. त्यामुळे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आरोप हा बिनबुडाचा ठरतो.

कोविड मृत्यू व कोविड इतर (covid other) कारणांनी मृत्यू हे निकष महानगरपालिका प्रशासनाने स्वतः निश्चित केलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) व केंद्र सरकार यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच कोविड रुग्णांच्या मृत्युंची नोंद करण्यात येते. त्याबाबतची सर्व माहिती नोंदवून जतन करण्याची कार्यवाही नियिमतपणे केली जाते. त्यांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. त्यानुसारच मृत्यूचे कारण (Cause of Death) व इतर माहिती नोंदवली जाते आहे. कोरोना बाधित मृतांची आकडेवारी देताना त्यासोबत त्यांना असलेल्या इतर आजारांचा ही उल्लेख केला जातो. याचा अर्थ कोविड हे कारण झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गृहीत धरला जाऊ नये. हे विश्लेषण दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून देखील पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामागचा हेतू इतर आजारांचे निमित्त पुढे करणे असा होत नाही. उलट संबंधित इतर आजार असलेल्या नागरिकांनी आपापल्या परीने योग्य काळजी घ्यावी, नियमितपणे औषधे घ्यावीत, असे जाहीर आवाहन करून संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

कोविड संसर्ग मृत्यूदर –

मुंबईतील कोविड संसर्गाचा दर हा लपविण्याचा किंवा कमी दाखवण्याचा कोणताही प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाने केलेला नाही. दैनंदिन चाचण्या, बाधितांची संख्या, मृत्युंची संख्या हे सर्व कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सरकारकडे नियमितपणे सर्व माहिती दिली जाते. जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये कोविड संसर्ग मृत्यू दर हा सरासरी ०.७१ टक्के इतका आहे. या कालावधीतील कोविड इतर (covid other) झालेले इतर मृत्यू जरी यात जमेस धरले तरी हा दर ०.९८ टक्के इतका म्हणजेच १ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. सद्यस्थितीत जागतिक कोविड मृत्यू दर हा २.११ टक्के इतका तर भारताचा मृत्यू दर हा १.१२ टक्के इतका आहे. म्हणजेच या दोन्ही तुलनांमध्ये मुंबईतील कोविड संसर्ग मृत्यू दर हा कमी आहे.

कोविड चाचण्या –

मुंबईतील चाचण्यांची संख्या मुळीच कमी झालेली नाही. किंबहुना चाचण्यांची संख्या वर्षभरापासून सातत्याने वाढते आहे. २०२१ या वर्षाचा विचार केला तर जानेवारीमध्ये ४ लाख ४४ हजार ७८३, फेब्रुवारीमध्ये ४ लाख ७६ हजार २५४, मार्च ८ लाख ३८ हजार २१०, एप्रिलमध्ये १३ लाख ३१ हजार ६९७ इतक्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. मे २०२० ते ७ मे २०२१ या वर्षभराच्या कालावधीमध्ये मुंबईत एकूण ५९ लाख १८ हजार ८१५ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या जितकी अधिक तितके अधिकाधिक बाधितांना शोधणे अधिक सोपे, हे सूत्र लक्षात ठेवून चाचण्यांचा वेग कायम ठेवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT