पुन्हा राणे विरूद्ध शिवसेना! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई महापालिकेची नोटीस

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रा मुंबई आणि इतर महापालिकांच्या निवडणुका अद्याप जाहीर व्हायच्या आहेत. मात्र त्याआधीच शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष सुरू झाला आहे. एकीकडे राज्यात किरीट सोमय्या विरूद्ध संजय राऊत असा सामना पाहण्यास मिळतो आहे. अशातच आज मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाबाबत नोटीस पाठवली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू या ठिकाणी एक बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आल्याने मुंबई महापालिकेने ही नोटीस धाडली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात नारायण राणेंना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध नारायण राणे असा वाद रंगण्याची चिन्हं आहेत.

मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथक आज नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यात पाहणी करून अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीबाबत तपासणी करेल, अशी नोटीस राणे यांना पाठवली आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केली आहे. बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची याआधी तक्रार करूनही महापालिकेनं कारवाई केली नसल्याचं दौंडकर यांनी महापालिकेला कळवलं आहे. त्यानंतर महापालिकेनं ही नोटीस पाठवली आहे. बंगल्याचं बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

हे वाचलं का?

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्याबाबत नेमके आक्षेप काय?

ADVERTISEMENT

नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाबत आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्याकडून तक्रार

ADVERTISEMENT

बंगल्याचं बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार

बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करत कारवाईसाठी संतोष दौंडकर यांच्याकडून 2017 पासून पाठपुरावा

मुंबई महापालिकेच्या के पश्चिम वॉर्डच्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटकडून नारायण राणेंना नोटीस

अनधिकृत बांधकामाबाबत आलेल्या तक्रारींनंतर बंगल्याची पाहणी करण्यासाठी मनपाकडून नारायण राणे यांना नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर विविध आरोप केले होते. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हे शिवसेना नेते कधीपासून झाले? तो तर मातोश्रीवर बॉयचं काम करत होता. असा सवालही विचारला होता. तसंच मला तोंड उघडायला लावू नका तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढू शकतो असाही इशारा त्यांनी संजय राऊत यांना दिला होता. या सगळ्याला दोन दिवस होत नाहीत तोच नारायण राणेंना नोटीस धाडण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT