Water Logging in Mumbai : नाल्यात कचरा टाकाल तर २०० रुपये दंड – BMC चा निर्णय

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मान्सूनने मुंबईत धडक दिली आणि पहिल्याच पावसात मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच पितळ उघड पडलं. गेल्या ३-४ दिवसांत शहरात पावसाची संततधार कायम असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत. एकीकडे नालेसफाईवरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं राजकारण रंगलेलं असता महापालिका प्रशासनाने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती सदस्य यशवंत जाधव यांनी महापालिका प्रशासनाला नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरीक्त अशा भागांमध्ये CCTV द्वारे लक्ष ठेवण्याचाही BMC चा विचार आहे.

Monsoon in Mumbai : रविवार-सोमवार शहरात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज

हे वाचलं का?

“मुंबईत पावसाचं पाणी साचणार नाही यासाठी महापालिका प्रशासन वारंवार प्रयत्न करत आहे. मुंबईतले नाले, नदी, जिथे पाणी साचतं असे जलमय भाग वारंवार स्वच्छ केले जात आहेत. पण आमच्या लक्षात आलंय की नाल्यांमध्ये अनेकदा लोकं प्लॅस्टिकचा कचरा आणि इतर गोष्टी फेकतात. हा कचरा अनेक भागांमध्ये साठून राहतो त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी नाले तुंबण्याचं आणि पाणी साचण्याचं प्रमाण वाढत आहे”, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने नाल्यांमध्ये कचरा फेकणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच या भागांमध्ये लोकांमध्ये जनजागृती करुन सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पी.वेलारसु यांनी दिली.

ADVERTISEMENT

Vasai-Virar मध्ये पावसाची जोरदार बॅटींग, नवी मुंबईत झाड गाडीवर कोसळून नुकसान

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT