तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात करणं Akshay Kumar ला पडलं महागात, मागावी लागली माफी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला आपण विमल इलायचीच्या जाहिरातीत आपण पाहिलंच असेल. या जाहिरातीत शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत खिलाडी अक्षय कुमार हा देखील दिसत आहे. शाहरुख खान आणि अजय देवगण यांचं या जाहिरातीमुळे फारसं काही बिघडलेलं नाही, परंतु अक्षय कुमार या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल झाला आहे. लोकांनी तुफान टीका केल्यानंतर आता अक्षय कुमारने मोठी घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

अक्षयने का मागितली चाहत्यांची माफी?

आपल्या चाहत्यांची माफी मागून अक्षय कुमारने या जाहिरातीवरून हात मागे घेतला आहे. आपण यापुढे तंबाखू ब्रँडचा (विमल) ब्रँड अॅम्बेसेडर राहणार नसल्याचे त्याने जाहीर केले. अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

अक्षय कुमारने इंस्टा पोस्टमध्ये लिहिले – ‘मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रभावित केले आहे. मी तंबाखूला कधीही मान्यता दिली नाही आणि करणारही नाही. विमल इलायची यांच्याशी असलेल्या माझ्या असोसिएशनबद्दल मी तुमच्या भावनांचा आदर करतो. म्हणूनच मी नम्रतेने यातून माघार घेत आहे.’

अक्षय कुमारची पोस्ट

ADVERTISEMENT

‘मी ठरवले आहे की जाहिरातीतून मिळालेले पैसे मी चांगल्या कारणासाठी वापरेन. ब्रँडची इच्छा असल्यास, ते कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात प्रसारित करणे सुरू ठेवू शकतात. पण मी वचन देतो की, भविष्यात मी हुशारीने पर्याय निवडेन. त्या बदल्यात, मी नेहमीच तुमचे प्रेम मागत राहीन.’

ADVERTISEMENT

लोकांनी अक्षय कुमारला केले ट्रोल

अक्षय कुमारची ही जाहिरात काही दिवसांपूर्वी रिलीज झाली आहे. ज्यामध्ये शाहरुख खान आणि अजय देवगणने ‘विमल युनिव्हर्स’मध्ये अक्षय कुमारचे स्वागत केले. बॉलिवूडचे तीनही मोठे स्टार्स (शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार) पहिल्यांदाच एका जाहिरातीत दिसले.

ही मोठी गोष्ट असली तरी तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी तिघांनी हातमिळवणी केली होती. त्यामुळे ती अॅड ट्रोलरर्सच्या निशाण्यावर आली. अजय देवगण यापूर्वीही अनेक तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीमध्ये दिसला आहे. शाहरुख खानने देखील अशा अनेक जाहिराती केल्या आहेत. पण याआधी असा गदारोळ झालेला नाही. मात्र, अक्षय कुमार दिसताच लोकांनी एकच गोंधळ घातला.

होळीच्या ‘त्या’ ट्विटमुळे अक्षय कुमार झाला ट्रोल!

अक्षय कुमारच्या चाहत्यांनी त्याचे जुने व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. ज्यात तो अल्कोहोल, सिगारेट सारख्या हानिकारक उत्पादनांपासून दूर राहण्याबद्दल बोलत असल्याचे सांगत आहे.

तीन वेळा पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या अक्षय कुमारला अनेकांनी पुरस्कार देखील परत करण्यास सांगितलं आहे. बरं, अनेक टीकेचा सामना केल्यानंतर अभिनेत्याने माफी मागितली आहे, आता अक्षय कुमारच्या या माफीचा चाहत्यांवर किती परिणाम होतो हे येणारा काळच सांगेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT