दिग्गज संगीतकार वनराज भाटिया यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिग्गज म्युसिक डायरेक्टर आणि नॅशनल अवॉर्डचे विजेते वनराज भाटिया यांचं आज निधन झालं आहे. मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 93 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अभिनेता फरहान अख्तरने त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

वनराज यांनी मंथन, भूमिका, जाने भी दो यारो 36 Chaurangi Lane, जुनून या सिनेमांसाठी म्युसिक कंपोस केलं होतं. त्याचप्रमाणे भारत एक खोज आणि तमस या टीव्ही शोंसाठी देखील त्यांनी संगीत दिलं होतं. वनराज यांना भारताचे वेस्टर्न क्लासिकल म्युसिकचे सर्वात मोठं कंपोजर म्हटलं जायचं. 1988 मध्ये ‘तमस’ या टीव्ही कार्यक्रमातील संगीतकार्यासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. तर 2012 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.

वनराज भाटिया यांनी लंडनच्या रॉयल अ‍ॅकेडमी आॅफ म्युझिक इथून संगीताचं शिक्षण घेतलं होते. 1959 साली ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. करियरच्या सुरुवातीला त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल बनवण्याचं काम केलं. त्यावेळी त्यांनी सुमारे 7 हजारांवर जाहिरातींला जिंगल दिले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT