Vicky-Katrina : कतरिना कैफ-विकी कौशल ‘या’ हॉटेलमध्ये करणार लग्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. तशी लगबग सुरू असून, दोघंही डिसेंबरमध्ये दोघं राजस्थानातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये विवाह करणार आहेत. (bollywood news katrina kaif vicky kaushal wedding place)

हे वाचलं का?

विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघे राजस्थानमध्ये विवाह करणार आहेत. सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेल्या एका अलिशान हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे.

ADVERTISEMENT

सिक्स सेंसेज फॉर्ट हॉटेल, असं या हॉटेलचं नाव असून, 7 ते 12 डिसेंबरपर्यंत या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

सिक्स सेंसेज फॉर्ट एक अलिशान हॉटेल म्हणून प्रसिद्ध असून, हॉटेलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार राजा मान सिंह सूट सर्वात महागडा आहे. या सूटचं एका रात्रीचं भाडं 64,000 ते 90,000 इतकं आहे.

या सूटमध्ये स्वतंत्र बेडरूम, खाजगी स्नानगृह, पूल, टेरेस, आऊटडोअर शॉवर यासह विविध सुविधा आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या विवाह सोहळ्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून, त्यासाठी कंपन्यांना काम देण्यात आलेलं आहे.

ज्या कंपन्यांना लग्नातील विविध कार्यक्रमाचं काम मिळालेलं आहे. त्यांचे प्रतिनिधी मागील काही दिवसांपासूनच सवाई माधोपूरमध्ये पोहोचले होते. तर विकी-कतरिनाच्या टीमनेही लग्नाची तयारी सुरू केली होती.

सिक्स सेंसेज फॉर्ट हॉटेलमध्ये विकी-कतरिना विवाहबद्ध होणार असून, यापार्श्वभूमीवर सवाई माधोपूर जिल्हा प्रशासनाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलची आढावा बैठकही 3 डिसेंबर रोजी पार पडली.

काही दिवसांपूर्वीच आयोजन करणाऱ्या टीमकडून नवरदेवाची एंन्ट्री आणि मेहंदीचा कार्यक्रमच्या ठिकाणाची टीमकडून पाहणी करण्यात आली होती.

काही दिवसापूर्वी विकी कौशलने लग्नानंतर राहण्यासाठी विराट कोहलीच्या इमारतीत आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतल्याची माहितीही समोर आली होती.

विकी कौशल आणि कतरिनाच्या घरीही लग्नाची लगबग दिसून येत असून, दोन्हीकडील वऱ्हाडी लवकरच राजस्थानात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT