आर्यन खानची दिवाळी ‘मन्नत’वर; बॉम्बे हायकोर्टाने केला जामीन मंजूर
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 2 ऑक्टोबरला एनसीबीने छापा मारून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आत्तापर्यंत तीनवेळा त्याला जामीन नाकारण्यात आला होता. आज अखेर त्याला जामीन मिळाला आहे. उद्या किंवा परवा आर्यन खान तुरूंगाबाहेर येणार आहे. आज हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर आज […]
ADVERTISEMENT

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 2 ऑक्टोबरला एनसीबीने छापा मारून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आत्तापर्यंत तीनवेळा त्याला जामीन नाकारण्यात आला होता. आज अखेर त्याला जामीन मिळाला आहे. उद्या किंवा परवा आर्यन खान तुरूंगाबाहेर येणार आहे. आज हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर आज हायकोर्टाने आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Bombay High Court grants bail to Aryan Khan in drugs-on-cruise case pic.twitter.com/MerVWcfpYZ
— ANI (@ANI) October 28, 2021
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. डिटेल ऑर्डर उद्या दिली जाणार आहे. दिवाळीच्या आधी या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांना उद्या किंवा परवा तुरुंगाबाहेर येता येणार आहे. आर्यन खानला 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.

आर्यन खानला सत्र न्यायालयाने दोनदा जामीन नाकारला होता. एवढंच नाही तर हायकोर्टानेही मागचे दोन दिवस सुनावणी राखून ठेवली होती. जर आर्यनला आज किंवा उद्या जामीन मंजूर झाला नसता तर त्याची दिवाळी तुरुंगातच होणार होती. मात्र मुकुल रोहतगी यांनी आज ही माहिती दिली आहे की उद्या किंवा परवा म्हणजेच शुक्रवारी किंवा शनिवारी आर्यन खानला तुरुंगाबाहेर येता येणार आहे. तीन दिवस हे प्रकरण सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टात होती.
