अमरावती शहरातील दुमजली इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू, दोन जखमी
अमरावती (धनंजय साबळे) : शहरातील प्रभात चौक येथील जुनी दुमजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. जखमींवर इर्विन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीचा वरचा मजला रिकामा करण्यात आला होता, तर खालच्या मजल्यावर नुतनीकरणाचे काम सुरु होते. त्याचवेळी ही इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. अमरावतीचे […]
ADVERTISEMENT
अमरावती (धनंजय साबळे) : शहरातील प्रभात चौक येथील जुनी दुमजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. जखमींवर इर्विन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीचा वरचा मजला रिकामा करण्यात आला होता, तर खालच्या मजल्यावर नुतनीकरणाचे काम सुरु होते. त्याचवेळी ही इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
अमरावतीचे तहसिलदार संतोष काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहमद कमर इकबाल मोरफीक (३५), मोहमद आरीफ शेरहीम (३५), रोजवान शहा शरीफ शेख (२०) , रवी परमार (४२) अशी मृतांची नाव आहेत. तर एका ४० वर्षीय पुरुष जातीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. सोबतच राजेश ज्ञानेश्वर कदम (४५) आणि राजश्री रासेकर (३५) हे दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर इर्विन हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
दुर्घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत कौर-राणा, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त आरती सिंह, तहसीलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मदतकार्याचा आढावा घेऊन सुचनाही दिल्या.
हे वाचलं का?
दरम्यान, याबाबत शहर अभियंता सुहास चव्हाण यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन महापालिकेने यापूर्वी ७ वेळा नोटीस दिल्या होत्या. नुतनीकरणासाठीही परवानगी देण्यात आली नव्हती. तसंच वरचा मजला रिकामा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर देखील खालच्या मजल्यावर नुतनीकरणाचे काम सुरु होते. त्याचवेळी ही इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत घरमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT