बुलढाण्यातील ‘अंबाशी’ गाव काढलं विकायला; ग्रामपंचायतीचाही पाठिंबा : नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, बुलढाणा :

ADVERTISEMENT

राज्यातील जत, अक्कलकोट, सुरगाणा, धर्माबाद या तालुक्यातील सीमेवरील काही गावांची असुविधांमुळे शेजारील राज्यात जाण्याची मागणी अद्याप ताजी आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ‘अंबाशी’ गावातील ग्रामस्थांनी सरकारच लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क संपूर्ण गावचं विक्रिला काढलं आहे. विषेश म्हणजे या गोष्टीला ग्रामपंचायतीनेही ठराव करुन पाठिंबा दिला आहे.

नेमकं काय झालयं?

अंबाशी ग्रामस्थांनी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारवरचं “अंबाशी गाव विकणे आहे ” चा फलक लावून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार, मागील दीड वर्षापूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे चिखली तालुक्यातील आंबाशी आणि आमखेड येथील दोन्ही धरण फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालं होतं.

हे वाचलं का?

तेव्हापासून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडे धरण दुरुस्ती आणि नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. मात्र शासन अद्यापही याकडे दुर्लक्ष करत आहे. ढगफुटीमुळे पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांच्या जमीन खरडून गेल्या, पंचनामे झाले, मात्र, अद्यापही ना नुकसानभरपाई मिळाली ना तलावाची दुरुस्ती झाली, ना शेतकऱ्यांवरील संकट दूर झाले, असेही इथले गावकरी सांगत आहेत.

अंबाशी ग्रामपंचायतीचाही पाठिंबा :

दरम्यान, ग्रामस्थांनी घेतलेल्या या भूमिकेला ग्रामपंचायतीनेही पाठिंबा दिला आहे. २९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीने यासंदर्भातील ठराव मंजूर केला आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे ठरावामध्ये?

आज दिनांक २९/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता ग्रा.पं. कार्यालयाची मासिक सभा सरपंच श्रीमती कुसुम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असता सभेचा वृत्तांत खालील प्रमाणे.

ADVERTISEMENT

उपरोक्त विषयान्वये, सभेत चर्चा केली असता २८/०६/२०२१ रोजी अंबाशी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडून धरण फुटून शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वारंवार शासनास व प्रशासनास प्रत्यक्ष सांगुन, निवेदने देऊन, आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची मदत झालेली नाही. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपले अंबाशी गावं विकणे आहे. करीता हा उपक्रम राबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पुर्ववत करण्यासाठी व धरणाची भिंत दुरुस्त करण्यासाठी हा उपक्रम राबवावा असे सभेत ठरले व हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.

कुसुम गायकवाड, सरपंच,अंबाशी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT