भोर तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन, चौघांवर गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील देगाव येथे माळरानावर रविवारी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्यानंतरही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अशा पद्धतीने शर्यती सुरु असतात. रविवारी झालेल्या स्पर्धेत ३० ते ३५ स्पर्धक सहभागी झाले होते.

ADVERTISEMENT

स्पर्धेच्या आयोजकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करत असताना स्पर्धकांनी सहभाग घ्यावा यासाठी पोलिसांनी आम्ही मॅनेज केलं आहे…त्यामुळे स्पर्धेला परवानगी मिळाली आहे अशी बतावणी केली. सध्या कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, उत्सव यांवर बंदी घातली आहे. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन कारवाई करत वाहनं आणि बैलगाडा जप्त केला आहे.

स्पर्धा सुरु असताना अचानक पोलिसांची धाड पडल्यानंतर स्पर्धकांची चांगलीच धावपळ झाली. या स्पर्धेचं आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन स्पर्धक आणि आयोजकांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT