Lockdown मुळे दीड वर्षांपासून व्यवसाय बंद, आर्थिक अडचणीमुळे कल्याणमधील व्यवसायिकाची आत्महत्या
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने व्यवसायिकांवर अनेक निर्बंध घातले. या निर्बंधांमध्ये कालांतराने शिथीलता आणली गेली असली तरीही अनेक व्यवसायिकांना या लॉकडाउनचा फटका बसला आहे. कल्याणमधीस प्रिटींग प्रेसचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यवसायिकाने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. बंडू पांडे असं या व्यवसायिकाचं नाव असून त्यांची उल्हासनगर कँप नंबर ३ इथे ओम शांती […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने व्यवसायिकांवर अनेक निर्बंध घातले. या निर्बंधांमध्ये कालांतराने शिथीलता आणली गेली असली तरीही अनेक व्यवसायिकांना या लॉकडाउनचा फटका बसला आहे. कल्याणमधीस प्रिटींग प्रेसचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यवसायिकाने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे.
ADVERTISEMENT
बंडू पांडे असं या व्यवसायिकाचं नाव असून त्यांची उल्हासनगर कँप नंबर ३ इथे ओम शांती प्रिंटर्स नावाने एक प्रिंटींग प्रेस होती. कोरोना महामारी आणि त्यानंतर लॉकडाउमुळे पांडे यांची प्रेस जवळपास दीड वर्ष बंद होती. ज्यामुळे पांडे यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. आर्थिक अडचणीचा सामना करण्यासाठी त्यांनी आपल्या प्रेसमधलं साहित्य विकायला सुरुवात केली.
हे वाचलं का?
प्रेसमधली २ लाखांची मशीन पांडे यांना २० हजारांना विकावी लागली. ज्यामुळे पांडे निराश झाले होते. याच नैराश्यातून रविवारी मध्यरात्री त्यांनी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी बंडू पांडे यांनी चिठ्ठी लिहून ठेवत आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं लिहून ठेवलं आहे. लॉकडाउनमुळे एका व्यवसायिकाला आपलं जीवन संपवावं लागल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT