पुण्यात चारित्र्यावर संशय घेऊन पतीचा पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुण्यात (Pune) पतीनेच (Husband) पत्नीच्या (Wife) चेहऱ्यावर अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने कामाचे ठिकाण न दाखवल्याने पतीने तिच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकल्याची घटना पुण्यातील बोपदेव घाटात घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने हे भयंकर कृत्य केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ आरोपी पतीला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

आरोपी पती दिनेश धुमक (वय 39 वर्ष) हा बावधन गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती त्याच्या अटकेनंतर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

उपनिरीक्षक चैताली गापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश आणि फिर्यादी पत्नी या दोघांचा प्रेम विवाह असून आरोपी पती फिल्टर दुरूस्तीचे काम करतो. तर फिर्यादी पत्नी घरगुती काम करते. काही दिवसापासून आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत होती.

हे वाचलं का?

प्रेयसीला पेटवणाऱ्या प्रियकराचाच मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

ज्या दिवशी ही घटना घडली तेव्ही आरोपी पती दिनेश हा आपल्या पत्नीला म्हणाला की, ‘तू कुठं काम करतेस ते मला दाखव’, असं म्हणत त्याने पत्नीला गाडीवर बसवून बोपदेव घाटामध्ये नेलं. मात्र तिथे पोहचल्यावर तिने आपल्या कामाचे ठिकाण दाखविण्यास त्याला नकार दिला. त्यामुळे दिनेशच्या रागाचा पारा आणखी चढला.

ADVERTISEMENT

‘तू कशी काम करतेस हेच बघतो,’ असं म्हणत त्याने आपल्या आपल्या पत्नीला तिच्या तोंडावरील मास्क खाली घेण्यास सांगितला. पत्नीने मास्क खाली घेताच पती दिनेशने त्याचवेळी त्याच्या जवळ असलेल्या बाटलीमधील अ‍ॅसिड थेट पत्नीच्या तोंडावर आणि अंगावर फेकलं. यामध्ये त्याची पत्नी ही गंभीररित्या जखमी झाली. तिच्या डाव्या डोळ्याला आणि डाव्या दंडाला गंभीर इजा झाली आहे.

ADVERTISEMENT

Pune: Whatsapp चॅट करत असल्याच्या संशयावरुन बापाने दोन्ही मुलींना ट्रकखाली चिरडलं

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक पोलीस स्थानकाला मिळताच त्यांनी जखमी महिलेस तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर आरोपी दिनेशला याला अवघ्या काही तासात अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT