मृतदेहांमधून कोरोना पसरू शकतो, कसे केले जावेत अंत्यसंस्कार?
मुंबई: कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे भारतात हाहाकार उडाला आहे. या धोकादायक व्हायरसमुळे बर्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह हे रुग्णलायकडून व्यवस्थित पॅक करुन दिले जातात आणि तशाच अवस्थेत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. बर्याच लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की, कोरोना संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेमके काय प्रोटोकॉल काय आहेत. कोरोनाबाधिता मृतदेह कुटुंबाला […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे भारतात हाहाकार उडाला आहे. या धोकादायक व्हायरसमुळे बर्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह हे रुग्णलायकडून व्यवस्थित पॅक करुन दिले जातात आणि तशाच अवस्थेत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. बर्याच लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की, कोरोना संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेमके काय प्रोटोकॉल काय आहेत. कोरोनाबाधिता मृतदेह कुटुंबाला का दिले जात नाही? आणि कोरोना विषाणू एका मृत शरीरावर पसरतो? याचबाबत आता या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात मिळू शकतील.
ADVERTISEMENT
कोरोना-संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणती मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातात?
सन 2020 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ज्या वेळेस ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली गेली त्या वेळी या आजारामुळे भारतात केवळ 2 लोकांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत ही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आली होती.
हे वाचलं का?
संतापजनक घटना… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह
– स्वच्छतेची काळजी घ्या. वॉटरप्रूफ पीपीई किट वापरा, मास्क, चष्मा, हातमोजे इत्यादी देखील वापरावेत.
ADVERTISEMENT
– मृतदेह जंतुनाशक पिशवीत ठेवले पाहिजे. यानंतर, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या पांढऱ्या चादरीत तो लपेटला पाहिजे.
ADVERTISEMENT
– मृतदेहांच्या संपर्कात जे काही कर्मचारी येऊ शकतात त्यांना संक्रमणाचा प्रसार कसा होऊ नये याविषयी प्रशिक्षण दिले पाहिजे.
– रुग्णाच्या शरीरात लावण्यात आलेल्या नळ्या इत्यादी काळजीपूर्वक काढून टाकल्या पाहिजेत आणि शरीरातून द्रव बाहेर पडणार नाही याची खबरदारी घ्यावी.
– 1 टक्के हायपोक्लोराइडच्या मदतीने मृतदेह ठेवलेल्या बॅगचं निर्जंतुकीकरण करावे.
-कुटुंबातील लोकांशिवाय मृतदेह कुणाकडेही सोपवू नये.
– कोरोना संसर्गाच्या उपचारादरम्यान वापरली जाणारी सर्व उपकरणांचं निर्जंतुकीकरण करावं.
ठाणे: कोरोना रुग्णाचा मृतदेह चक्क कचऱ्याच्या पिशवीतून पाठवला स्मशानात
– सर्व वैद्यकीय कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या नियमांची काळजी घेतली पाहिजे.
– कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन आणि त्यांच्या भावनांची काळजी घेतली पाहिजे.
– आयसोलेशन क्षेत्र हे एक टक्के सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशनच्या सहाय्याने स्वच्छ केले पाहिजे.
– शवगृहात मृतदेह ठेवताना कोल्ड चेंबरमधील तापमान 4 डिग्री सेल्सियस तापमान असणे आवश्यक आहे.
– शवगृह स्वच्छ ठेवली पाहिजे. येथेही एक टक्के सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशनच्या मदतीने प्रत्येक पृष्ठभाग स्वच्छ केला पाहिजे.
– शवगृहातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर एक टक्के सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशनने प्रत्येक मजला, दरवाजाची हँडल इत्यादी स्वच्छ करावं.
– जेवढ्या शक्य तेवढं शवविच्छेदन टाळलं जावं. जर काही कारणास्तव तसे करणे आवश्यक असेल तर विशेष खबरदारी घेतली पाहिजे.
– ज्या वाहनातून कोरोना बाधितांचे मृतदेह घेऊन जाणार आहात ते देखील व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. जे लोकं मृतदेहांसह असतील त्यांनी सर्जिकल मास्क, पीपीई कीट आणि हातमोजे वापरावे.
– स्मशानभूमी देखील स्वच्छ केली पाहिजे जेणेकरून कोणताही धोका नाही. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे वापरायला हवेत.
– मृतदेहापासून कुटुंबीयांना शक्य तेवढं दूर ठेवावं. मृतदेहाला मिठी मारणे आणि चुंबन घेणे यापासून रोखलं जावं.
-अंत्यसंस्कारात सामील झालेल्या लोकांनी आपले हात व्यवस्थित धुवावेत आणि स्वच्छता ठेवावी.
– अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी करु नये आणि सोशल डिस्टन्सिंग याची काळजी घेतली पाहिजे.
– मृतदेहांच्या राखातून कोणत्याही प्रकारचा धोका नाही त्यामुळे राख गोळा केली जाऊ शकते.
गेल्या दीड वर्षापासून एकही कोरोना रुग्ण न सापडलेलं महाराष्ट्रातील गाव!
तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय?
दिल्लीच्या पंडित मदन मोहन मालवीय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ मणिशंकर प्रियदर्शी म्हणतात की, आपण कोव्हिड रुग्णांचं मृतदेह हे संक्रमित असल्याचे मानतो. असे मृतदेह व्यवस्थित पॅक केल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येतात. हे मृतदेह अत्यंत काळजीने पॅक केले जातात. यानंतर अंत्यसंस्कारांसाठी दोन अटेंडंट पाठवले जातात. या दोघांनाही पीपीई कीट दिले जाते आणि कुटुंबासाठी 2 पीपीई किट देखील दिले जाते. जेणेकरून कुटुंबातील दोघं जण हे अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकतात.
तर एक निष्कर्ष असा आहे की मृतदेहांवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार केले जावे. जेणेकरून शरीरातून द्रव बाहेर पडणार नाही. तसेच मृतदेह हे यासाठी पॅक केलेले असतात जेणेकरून कोणत्याही प्रकारे द्रवपदार्थ बाहेर येऊ नाही. ही सगळी काळजी घेऊनच कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले पाहिजेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT