उद्या पुतिनना आदेश द्या असं सांगाल,आम्ही युद्ध थांबवा असं सांगू शकतो का?- सरन्यायाधीश रमण्णा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशिया-युक्रेन युद्धसंघर्षात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी महत्वाचं मत नोंदवलं आहे.

ADVERTISEMENT

आम्ही यात काय करु शकतो? उद्या तुम्ही पुतीन यांना आदेश द्या असं सांगाल, आम्ही पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ शकतो का? तिकडे अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दल आम्हालाही चिंता आहे. भारत सरकार त्यांचं काम करत आहे, असं रमण्णा म्हणाले.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनेक भारतीय विद्यार्थी मालडोवा-रोमानियाच्या सीमेवर अडकून आहेत. त्या भागात त्यांना सरकारची कोणतीही मदत मिळत नाहीये. २४ वर्षीय मेडीकल विद्यार्थी फातिमा अहानाच्या पालकांनी ही याचिका दाखल केली होती. Odessa University मधले जवळपास २५० विद्यार्थी मालडोवा-रोमानियाच्या सीमेवर कोणत्याही मदतशिवाय अडकले असल्याचं फातिमाच्या याचिकेत सांगितलं आहे.

हे वाचलं का?

युक्रेनमधल्या भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Bridge Of Hope, पियुष गोयल यांनी केलं कौतुक

रोमानियाची सीमा ओलांडून जाण्याची परवानगी मिळत नसल्यामुळे हे विद्यार्थी या भागात ६ दिवसांपासून अडकून राहिले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्या विद्यार्थीनीच्या वकीलांनी यात कोर्टाने मध्यस्थी करुन या विद्यार्थ्यांना रोमानियाच्या सीमेवरुन बाहेर काढत एअर इंडियाच्या विमानाने बाहेर काढण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली. याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे भारत सरकारने या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी Diplomatic Steps प्रभावी पद्धतीने घेण्याचे आदेश देण्याचीही मागणी केली.

ADVERTISEMENT

We are with you ! जगभरातून युक्रेनला मदतीचा ओघ वाढला

ADVERTISEMENT

सरन्यायाधीश रमण्णा यांच्यासमोर गुरुवारी सकाळी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने, याचिकाकर्ते वकील ए.एम.धर यांना आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करु शकतो का असं विचारलं? पुतीननी हे युद्ध थांबवावं असे आदेश आम्ही द्यावे अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारला. परंतू प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने Attorney General यांना याविषयात लक्ष घालण्याची विनंती केली.

युद्धभूमीतला संघर्ष जेव्हा आईच्या मिठीत संपतो

Attorney General के.के.वेणूगोपाल या सुनावणीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. ज्यावेळी त्यांनी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री रोमानियाला या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी गेल्याचं सांगितलं. या विद्यार्थ्यांना सीमा ओलांडायची परवानगी मिळावी आणि ती मिळाल्यानंतर त्यांना विमान मिळावं यासाठी केंद्रीय मंत्री प्रयत्न करत आहेत, असं सांगितलं. ज्यानंतर न्यायालयाने वेणूगोपाल यांना याचिका पाठवत या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT