Yes bank-DHFL Scam: अविनाश भोसलेंविरोधात CBIने दाखल केली चार्टशिट; काय केले आरोप?
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्यासह व्यावसायीक सत्येन टंडन यांच्याविरुद्ध चार्टशिट दाखल केली आहे. येस बँक डीएचएफएलमध्ये (DHFL) ३,७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चार्टशिट दाखल करण्यात आली आहे. अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील अनेक राजकारण्याच्या जवळचे व्यक्ती आहेत. या घोटाळ्याप्रकरणी सुरवातीला सीबीआयने त्यांना अटक केली होती त्यांनतर त्यांना ईडीकडे […]
ADVERTISEMENT
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्यासह व्यावसायीक सत्येन टंडन यांच्याविरुद्ध चार्टशिट दाखल केली आहे. येस बँक डीएचएफएलमध्ये (DHFL) ३,७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चार्टशिट दाखल करण्यात आली आहे. अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील अनेक राजकारण्याच्या जवळचे व्यक्ती आहेत. या घोटाळ्याप्रकरणी सुरवातीला सीबीआयने त्यांना अटक केली होती त्यांनतर त्यांना ईडीकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले. चौकशीदरम्यान ईडीने त्यांना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
ADVERTISEMENT
चौकशीदरम्यान, सीबीआयला आढळून आले की या संपूर्ण प्रकरणात अनेक आरोपींनी येस बँकेची एकूण ४,७३७ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. चार्टशिटमध्ये अविनाश भोसले आणि या केसशी संबंधित सहा कंपन्यांची नावं देखील आहेत. मेट्रोपोलिस हॉटेल्स, एबीआयएल (ABIL) इन्फ्राप्रोजेक्ट्स, एबीआयएल हॉस्पिटॅलिटी, अरिंदम डेव्हलपर्स, अविनाश भोसले ग्रुप आणि फ्लोरा डेव्हलपमेंट्स या कंपन्यांची नावं आहेत.
सीबीआयने मार्च २०२० पासून येस बँक आणि डीएचएफएल (DHFL) विरोधात दाखल केलेले हे चौथे आरोपपत्र आहे. गेल्या महिन्यात सीबीआयने रेडियस ग्रुपचे बिल्डर संजय छाब्रिया यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. डीएचएफएलचे प्रमोटर्स कपिल वाधवान, भाऊ धिरज वाधवान आणि येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविरोधात जून २०२० आणि जुलै २०२१ मध्ये दोन चार्टशिट दाखल केल्या होत्या.
हे वाचलं का?
येस बँक-DHFL घोटाळा नक्की प्रकरण काय आहे?
येस बँक DHFL ची केस मार्च 2020 मध्ये CBI ने नोंदवली होती. त्यानंतर सीबीआय आणि ED ने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर आणि DHFL चे तत्कालीन प्रोमोटर्स कपिल आणि धीरज वाधवन यांच्या घरावर छापे टाकले. या प्रकरणी राणा कपूर आणि कपिल वाधवन यांना अटक करण्यात आली होती. सीबीआय तपास सुरू करणार होती पण तोपर्यंत कोविड-१९ मुळे लॉकडाऊन जाहीर झाला. ईडीने २०२० मध्ये रेडियस ग्रुपच्या संजय छाब्रियांसह येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेल्या अनेक लोकांचे जबाब नोंदवले होते. सीबीआयने नंतर जून २०२० पर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आणि राणा कपूर तसेच इतरांना ताब्यात घेतले.
CBI ने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये, राणा कपूरने येस बँकेद्वारे DHFL डिबेंचरमध्ये 3,700 कोटी रुपये गुंतवले ज्यासाठी त्यांना त्यांच्या तीन मुली रोशनी, राधा आणि राखी यांच्या मालकीच्या कंपन्यांमधून 600 कोटी रुपये किकबॅक मिळाले. DHFL ने राणा कपूर यांच्या मुलींच्या मालकीच्या DOIT अर्बन व्हेंचर्स नावाच्या कंपनीला एका मालमत्तेच्या सुरक्षेसाठी 600 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, जे येस बँकेने डिबेंचरमधील गुंतवणुकीसाठी किकबॅक म्हणून कमी केले. DHFL नंतर येस बँकेच्या कर्जाच्या पेमेंटमध्ये डिफॉल्ट झाले. येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेतून, DHFL ने कर्जाच्या नावाखाली मोठा हिस्सा संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपकडे वळवला. त्रिज्या समूहानेही नंतर डीएचएफएलचे कर्ज चुकवले. सीबीआयने आरोप केला आहे की आरोपींनी गुन्हेगारी कट रचून वैयक्तिक फायद्यासाठी येस बँक आणि डीएचएफएलचे नुकसान केले आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात अविनाश भोसलेंचा काय रोल?
या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भोसले यांना मे महिन्यात अटक केली होती. त्याआधी एप्रिल महिन्यात सीबीआयने या प्रकरणी भोसले, शाहिद बलवा आणि इतरांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकले होते. अविनाश भोसले यांनी येस बँकेकडून डीएचएफएलला कोट्यवधींचे कर्ज देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यात त्यांना कमिशन स्वरुपात काही रक्कम मिळणार होती असा आरोप भोसलेंवरती आहे.
ADVERTISEMENT
संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या एव्हेन्यू 54, वन महालक्ष्मी या तीन प्रकल्पांसाठी 2018 मध्ये भोसलेंच्या कंपनीने डीएचएफएलकडून सुमारे 69 कोटी रुपये घेतल्याचा आरोप सीबीआयने केला होता. वरील दोन्ही प्रकल्प हे संजय छाब्रिया आणि सहाना समुहाचे बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक सुधाकर शेट्टी वरळीमध्ये करणार होते.
सीबीआयच्या तपासानुसार, एक करार झाला होता ज्या अंतर्गत भोसलेच्या कंपन्यांनी काही विशिष्ट सेवा पुरवायच्या होत्या, ज्यात आर्किटेक्चरल आणि इंजिनीअरिंग डिझाइन सल्लागार, बांधकाम सल्लागार, प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज लावण्यासाठी सल्लागार, प्रकल्प बांधकाम आणि करार सल्लागार आणि आर्थिक मूल्यांकन यांचा समावेश होता. परंतु तपासाअंती सीबीआय अधिकार्यांना असे आढळून आले की अशा कोणत्याही सेवा पुरविल्या गेल्या नाहीत. उलट कोणतेही काम किंवा सेवा न देता संपूर्ण रक्कम भोसलेंनी घेतली. भोसलेंनी कोणतेच काम केले नाही मग रक्कम त्यांना कशी दिली गेली याचा तपास सीबीआयने पुढे सुरु केला.
तपासाअंती ED ने अविनाश भोसलेला 28 जून रोजी अटक केली. त्यानंतर त्यांना नऊ दिवस ईडी कोठडीत पाठवण्यात आले, नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आता सीबीआयने नवीन चार्टशिट दाखल केली आहे, यामध्ये त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT