उल्हासनगर : रिक्षातून मोबाईल हिसकावणारे दोन आरोपी अटकेत
उल्हासनगर मध्ये रिक्षामधून मोबाईल हिसकावून चोरण्याचा नवीन प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणात मध्यवर्ती पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, या आरोपींनी केलेले ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख दहा हजाराचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. उल्हासनगर कँप क्रमांक तीन भागात असलेल्या गणेश नगर या वस्तीत एक व्यक्ती रस्त्यावर मोबाईलवर बोलत […]
ADVERTISEMENT
उल्हासनगर मध्ये रिक्षामधून मोबाईल हिसकावून चोरण्याचा नवीन प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणात मध्यवर्ती पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, या आरोपींनी केलेले ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख दहा हजाराचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
ADVERTISEMENT
उल्हासनगर कँप क्रमांक तीन भागात असलेल्या गणेश नगर या वस्तीत एक व्यक्ती रस्त्यावर मोबाईलवर बोलत जात असताना, त्याच्या मागून येणाऱ्या रिक्षामधील एका व्यक्तीने मोबाईल हिसकावला होता. सदर व्यक्ती आरोपीच्या मागे धावत जात असतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
गुजरातहून पुण्यात येणारा तब्बल 11 लाखांचा गुटखा जप्त, आळेफाटा पोलिसांची धाडसी कारवाई
हे वाचलं का?
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर मध्यवर्ती पोलिसांनी सोनू उर्फ डॉन श्याम पारचा आणि भारत प्रमोद जावळे या दोन आरोपीनाअटक केली, त्यांच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल, दोन एक्टिव्हा , एक रिक्षा आणि दोन सुरे जप्त केले हा सर्व मुद्देमाल दोन लाख दहा रुपयांचा आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
लातूरमध्ये बारावीत शिकणाऱ्या तरूणाची कोयत्याचे वार करून दिवसाढवळ्या हत्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT