LIVE Cinchpokli cha Chintamani 2024: चिंचपोकळीच्या 'चिंतामणी'चं आगमन सोहळा सुरू, पाहा पहिली झलक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chinchpokali Chintamani Aagman Sohala
Chinchpokali Chintamani Aagman Sohala
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोठ्या जल्लोषात साजरा होतोय चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा

point

चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला जाण्यापूर्वी या सूचना नक्की वाचा

point

चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी गणेशभक्तांना केलं मोठं आवाहन

Chinchpokli Cha Chintamani 2024 Aagman : मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. लालबाग, चिंचपोकळीचा परिसर गणेशोत्सवात टाळ-मृदूंगाच्या गजराने दुमदमतो. ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे, त्यामुळे तमाम गणेशभक्तांना गणपतीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. अशातच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आज शनिवारी आगमन होणार आहे. तत्पूर्वी, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून गणेशभक्तांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाप्पाच्या आगमनाची लाखो भाविक आतुरतेने वाट पाहत होते. आज दुपारी २ वाजल्यापासून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झालीय.

ADVERTISEMENT

मंडळाच्या अध्यक्षांनी गणेशभक्तांना केलं मोठं आवाहन

चिंचपोकळी चिंतामणीचं १०५ व्या वर्षांचं आगमन आज ३१ ऑगस्ट २०२४ रोजी गणेश टॉकीजच्या समोरून दुपारी २ वाजता सुरु झालं आहे. या आगमन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांचं मी स्वागत करतो. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की, मंडळाने दिलेलं ओळखपत्र सोबत ठेवा. पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा.

हे ही वाचा >> Sanjay Raut: शिल्पकाराला सुपारी कोणी दिली? शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेमागे ठाणे कनेक्शन?

या सोहळ्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये म्हणून याची काळजी चिंतामणी गणेशोत्सव मंडळ घेणार आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात काही घडत असेल, तर कार्यकर्त्यांना किंवा पोलिसांना त्वरीत सांगा. सुरक्षीततेची पूर्ण काळजी मंडळ करेल, याची आम्ही ग्वाही देतो, असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास उमानाथ पै यांनी केलं आहे. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >> IMD Todays Rain Update: मुंबईत धो धो कोसळणार? पुढील २४ तासांसाठी पावसाची स्थिती काय?

'असा' आहे चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाचा इतिहास

चिंचपोकळीच्या चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 1944 रोजी रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यानंतर 1956 साली या मंडळाची घटना तयार करण्यात आली. यापूर्वी चिंचपोकळी असं नाव देण्यात आलं होतं. परंतु, आता चिंचपोकळी उत्सव मंडळ असं नामकरण करण्यात आलं आहे. समाजप्रबोधन आणि लोकशिक्षण कार्य सिद्धीस नेण्याचं या मंडळाचं उद्दीष्ट आहे. तसच या मंडळाचा सुवर्णमहोत्सव 1968-69 रोजी, हीरक महोत्सव 1979-80 आणि अमृतमहोत्सव 1994-95 रोजी साजरा करण्यात आला आहे.

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT