Pune BJP: पुण्यात चक्का जाम आंदोलन भाजपच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
पुणे: ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी आज (26 जून) राज्यभरात भाजपकडून (BJP) ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पुण्यातील (Pune) कात्रज चौकात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनादरम्यान कोरोना नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याने, भारती विद्यापीठ पोलीस (Police) स्टेशनमध्ये आयोजकांसह 100 ते 150 जणांविरोधात गुन्हा […]
ADVERTISEMENT
पुणे: ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी आज (26 जून) राज्यभरात भाजपकडून (BJP) ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पुण्यातील (Pune) कात्रज चौकात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
ADVERTISEMENT
मात्र या आंदोलनादरम्यान कोरोना नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याने, भारती विद्यापीठ पोलीस (Police) स्टेशनमध्ये आयोजकांसह 100 ते 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांसह खासदार,आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हे वाचलं का?
OBC आरक्षणावरुन भाजपनं पेटवलं रान, पाहा महाराष्ट्रात कुठे-कुठे करण्यात आला चक्का जाम
या आंदोलनात 200 हून अधिकारी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र त्यावेळी बहुतांश आंदोलनकर्त्यांनी मास्क घातले नव्हते. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले गेले नाही. त्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मधील हवालदार संतोष किसन भापकर यांनी फिर्याद दिली.
ADVERTISEMENT
त्यानुसार भाजप ओबीसी पुणे शहर अध्यक्ष योगेश पिंगळे, आयोजक दीपक माने, ओंकार माळवदकर, शंतनू नरके, यशोधन आखाडे, अतुल चाकणकर, तुषार रायकर, दिनेश नायकू यांच्यासह 100 ते 150 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मराठा आणि ओबीसींमध्ये वाद, राजकारण करू नका. हे महापाप आहे. भिंत उभी करू नका. सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण शाहू महाराज,आंबेडकरांनी दिलं आहे.’
OBC Reservation : आमच्या हाती सूत्रं द्या, चार महिन्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो-फडणवीस
‘हा सामाजिक परिवर्तनाचा लढा, नेतृत्व माझे नाही तुमचं आहे, ही लढाई आपल्याला सर्वांनी मिळून जिंकायची आहे.’ असं म्हणत यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, आता चक्का जाम प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
देवेंद्र फडणवीसही उतरले रस्त्यावर
दुसरीकडे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ नागपुरात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विरोधात भाजपने चक्का जाम आंदोलन केलं.
नागपुरातील व्हेरायटी चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, या आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT