मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं सगळा पक्ष संपवला -चंद्रकांत पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वाती चिखलीकर, सांगली

ADVERTISEMENT

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेनं निशाणा साधला. ‘मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेनं सगळा पक्ष संपवला,’ असं म्हणत पाटील यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केलं. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवार आणि संचालकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इस्लामपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली.

हे वाचलं का?

‘मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने सर्व पक्ष संपवला आहे. राज्यात पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष राहिला आहे. आता गावागावात भाजपची ताकद वाढली आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे लोक कमी संख्येत आहेत’, असं म्हणत पाटील यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं.

सांगली जिल्हा बँकेत भाजपला धक्का! महाविकास आघाडी पॅनलकडून भाजपला धोबीपछाड

ADVERTISEMENT

‘आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील. स्थानिक पातळीवर एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर त्या-त्या जिल्हाध्यक्षांनी भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्याशी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. चर्चेशिवाय कोणताही निर्णय परस्पर घ्यायचा नाही’, असं आदेशही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले.

ADVERTISEMENT

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का

नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का बसला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला केवळ 4 जागांवरच विजय मिळवता आला. सत्यजीत देशमुख, संग्रामसिंह देशमुख आणि राहुल महाडिक यांनी विजय मिळवला आणि बँकेतलं भाजपचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT