राहुल गांधींनी आज ‘बाळासाहेबांना’ आदरांजली दिल्याचं दिसलं नाही : बावनकुळेंची खोचक टीका
नागपूर : राजीव गांधी यांच्या जयंती, पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली देतात. परंतु आज राहुल गांधी यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली दिल्याचं, प्रतिमेचे पूजन केल्याचं मला दिसलं नाही, असं म्हणतं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक भाषेत टीका केली. आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर […]
ADVERTISEMENT
नागपूर : राजीव गांधी यांच्या जयंती, पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली देतात. परंतु आज राहुल गांधी यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली दिल्याचं, प्रतिमेचे पूजन केल्याचं मला दिसलं नाही, असं म्हणतं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक भाषेत टीका केली.
ADVERTISEMENT
आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष पूर्ण काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे. काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे समर्पित झाले आहे. वीर सावरकरांबद्दल इतकं आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारत जोडो यात्रेचा उद्धव ठाकरे यांनी बहिष्कार करायला हवा होता. पण आदित्य ठाकरे यांना भारत जोडो यात्रेत पाठवून त्यांनी आता फक्त काँग्रेसचे संविधान स्वीकारणं बाकी ठेवलं आहे.
राहुल गांधी यांनी जे कमावलं ते गमावलं :
राहुल गांधींवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, देशाची मान खाली गेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी ज्या पद्धतीने आक्षेपार्ह विधान करत आहेत त्याचं समर्थन काँग्रेस पक्ष करत आहे. त्यांना सावरकरांचा इतिहास माहिती असूनही जाणीवपूर्वक आकसाने इतिहास दडपून टाकायचा प्रयत्न हे करत आहे.
हे वाचलं का?
स्वातंत्र्याचा इतिहास दडपून, सावरकरांचा इतिहास दडपून खऱ्या अर्थाने काँग्रेसने आज आपली देशाची जनता काँग्रेसला कधीच माफ करणार नाही. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेतुन जे एक, दोन टक्के काही कमवलं होतं ते कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून गमावला आहे. याचा एवढा निषेध करता येईल तेवढे कमी आहे, असंही ते म्हणाले.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
वीर सावरकरांचा अपमान झाल्यानंतर तो मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला याचा मला आनंद वाटतो. आदरणीय वीर सावरकर यांच्याबाबत आमच्या मनात अत्यंत आदर आणि श्रद्धा आहेच. ती कुणीही पुसायचं ठरवलं तरीही ती पुसता येणार नाही. पण आज स्वातंत्र्यवीराबाबत ते प्रश्न विचारत आहेत ज्यांच्या मातृसंस्थेच्या मुलांचा किंवा पिल्लांचा स्वातंत्र्यांशी काहीही संबंध नाही. स्वातंत्र्यवीरांबाबत असं प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. RSS स्वातंत्र्य लढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी याबाबत बोलू नये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT