RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अत्यंत मोठी कारवाई, मुख्य वनसंरक्षक रेड्डीला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील RFO दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणी आता एक अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना काल (28 एप्रिल) रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या धारणी पोलिसांनी रात्री उशिरा रेड्डी यांना नागपूरमधून अटक केली आहे. दीपाली चव्हाण यांनी उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरोधात वारंवार केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सुसाइड नोटमध्ये करण्यात आला होता. याचीच दखल घेतल निलंबित श्रीनिवास रेड्डी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

26 मार्च 2021 रोजी दीपाली चव्हाण यांनी आपल्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहली होती. ज्यामध्ये त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार आणि मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात होता.

संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. दीपाली चव्हाण यांचा मानसिक छळ करणाऱ्या विनोद शिवकुमार यांना घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली होती. तर मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचं महिन्यभरापूर्वीच निलंबन करण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

Dipali Chavan: महिला अधिकारी दीपाली चव्हाणांची गोळी झाडून आत्महत्या

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हे सतत पोलिसांपासून पळ काढत होते. अखेर काल रात्री उशिरा अमरावती पोलिसांनी नागपूरमधून रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

अमरावतीमधील मेळघाट हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्याने स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येआधी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाइड नोट देखील लिहिली होती. जी आता समोर आली आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी आरोप केला आहे की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार हे तिला सातत्याने त्रास देत होते, तिचा अपमान करत होते. याच सगळ्या प्रकाराला वैतागून दीपाल चव्हाण यांनी आत्महत्या केली होती.

Dipali Chavan: ‘तू पुन्हा लग्न कर पण नोकरीवाली बायको नको करू’, RFO दीपाली चव्हाणांचं शेवटचं पत्र

दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये नेमकं काय आरोप केले होते?

‘धूळघाट गॅरेजमधून माझी बदली हरिसालला झाली होती तेव्हा मी खूप खूश होती. कारण माझ्यावर चौकशी सुरू असून देखील तुम्ही मला तुमच्याकडे घेतले होते. पण आमच्यातीलच काही कर्मचाऱ्यांनी माझे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांचे कान भरायला सुरुवात केली व साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता मला वारंवार निलंबित करण्याची व चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले.’

‘माझ्याकडे गावांचे पुनर्वसन सुरू आहे. साहेबांनी कधी स्वतःहून गावात येऊन सभा घेतली नाही कधी क्षेत्रीय दौऱ्यासाठी गावात भेट दिली नाही. त्यांनी मला लोकांसमोर शिव्या दिल्या व पुनर्वसनमध्ये काय त्रास होत आहे याबाबत त्यांनी कधीच माझी बाजू ऐकून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडले ते फक्त आणि फक्त मला कमी दाखवण्याचे कारण शोधत राहायचे.’

‘गर्भपात झाला तरी रजा दिली नाही’, वाचा दीपाली चव्हाणच्या पतीची संपूर्ण मुलाखत

’17 मार्च 2020 रोजी मांगी येथील अतिक्रमणाबाबत त्यांनी मला फोन करून तू आत्ताच जाऊन अतिक्रमण काढ. आरोपीला ताब्यात घे, अतिक्रमण हटवताना तेथील स्थानिकांनी मला शिवीगाळ करून आम्हाला कोंडून ठेवले होते. याबाबत फोन करून व वायरलेसद्वारे सूचना देऊनसुद्धा ‘आरएफओ तुम झूट बोल रही हो नाटक कर रहे हो.’ असे ते म्हणाले. गावकरी माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार आहेत अशी मी त्यांना कळवले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘मैं खुदही बोल के तुम्हारे उपर अॅट्रोसिटी लगाता हूं, चार महीने जेल मे रखे तो कैसे लगता है वो देखता हूं.’ असं शिवकुमार मोबाइलवरुन मला बोलले. याचं माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे. ही रेकॉर्डिंग मी अमरावतीच्या खासदार नवनीत मॅडम यांनादेखील ऐकवली आहे.’

प्रेग्नंसीमध्ये मला त्यांनी चालायला लावले त्यामुळे माझा ऑपरेशन झालं त्याचीसुद्धा सुट्टी मला त्यांनी दिली नाही. मला गावकऱ्यांसमोर शिवीगाळ करणे अनेक वेळा त्यांनी रात्री-अपरात्री मला संकुलासमोर बोलवून अश्लील नजरेने पाहणे व माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांच्या मर्जीप्रमाणे वागले नसल्याने मला ते शिक्षा देत होते. एवढे लिहूनही रेड्डी सर तुम्ही त्यांचा काहीच बिघडू शकणार नाही कारण त्यांच्यावर तुमचाच वरदहस्त आहे. शेवटी माझ्या संपूर्ण आत्महत्येला विनोद शिवकुमार आणि वन्यजीव विभाग चिखलदरा हे आहेत.

‘ॲट्रॉसिटीमध्ये बेल न झाल्याने मी सुट्टीवर राहिले व तुम्हाला सगळ्यांना माहीत होते वेळोवेळी कोर्टाच्या निकालाबद्दल मी तुम्हाला देखील कळविले होते. पण सरांनी मला रुजू करून घेण्यास नकार दिला. तसेच माझी रजा कालावधी मधील सुट्टी ना करण्याची शिफारस केली. असे पत्र आपल्या वरिष्ठांना त्यांनी लिहिले.’ असे गंभीर आरोप दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये केले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT