Rashmi Shukla यांनी फोन टॅपिंगच्या परवानगीचा गैरवापर केला, सीताराम कुंटेंनी CM कडे सादर केला अहवाल

मुंबई तक

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांबाबतचा नवा अहवाल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता अहवालानंतर काय पावलं उचलणार ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० महिन्यात एक अहवाल त्यावेळी डीजी पदावर असणाऱ्या सुबोध जैस्वाल यांना पाठवला होता. यामध्ये बदल्यांच्या रॅकेटबद्दल महत्त्वाचा उल्लेख होता. त्यावेळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांबाबतचा नवा अहवाल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता अहवालानंतर काय पावलं उचलणार ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० महिन्यात एक अहवाल त्यावेळी डीजी पदावर असणाऱ्या सुबोध जैस्वाल यांना पाठवला होता. यामध्ये बदल्यांच्या रॅकेटबद्दल महत्त्वाचा उल्लेख होता. त्यावेळी सीताराम कुंटे हे अतिरिक्त मुख्य सचिव होते. रश्मी शुक्ला यांनी त्यावेळी पाठवलेल्या अहवालावरून देवेंद्र फडणवीस यांनी विविध आरोप केले आणि पोलीस दलात बदल्याचं रॅकेट कसं चालतं ते समोर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा नवा अहवाल सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे.

पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट हा फडणवीसांचा आरोप नवाब मलिकांनी तोच रिपोर्ट दाखवून कसा खोडला?

काय आहे अहवालात?

२ सप्टेंबर २०२० ते २८ ऑक्टोबर २०२० या कालावधीत रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहचवण्यासाठी शक्यता वर्तवून काही व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि इंडियन टेलिग्राफ अॅक्टखाली परवानगी घेतली असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आलं. वास्त इंडिया टेलिग्राम अॅक्टची तरतूद राष्ट्राची सुरक्षा व देशविघातक कृत्यं, सार्वभौमत्वाला धोका पोहचवणे, यावर प्रभावीपणे नजर ठेवा यावी आणि वेळीच असे षडयंत्र मोडता यावे यासाठी आहे.