Chinchwad पोटनिवडणुकीत नवा ड्रामा, अजितदादांचंही ऐकण्यास नकार; कलाटेंचं बंड
Chinchwad By-elections NCP: पिंपरी-चिंचवड: चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नवा ड्रामा पाहायला मिळाला आहे. चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढविणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी उमेदवारी देईल असा तर्क लढविण्यात येत होता. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी […]
ADVERTISEMENT
Chinchwad By-elections NCP: पिंपरी-चिंचवड: चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नवा ड्रामा पाहायला मिळाला आहे. चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढविणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी उमेदवारी देईल असा तर्क लढविण्यात येत होता. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी नाना काटेंना (Nana Kate) उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आहे. (chinchwad new drama in by elections rahul kalate refuses to listen to ajit pawar too will fill independent form)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: राहुल कलाटेंची समजूत घालण्याचा प्रयत्न करुनही राहुल कलाटे हे उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही राहुल कलाटे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. राहुल कलाटे हे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत.
हे वाचलं का?
या निवडणुकीत शिवसैनिक हे माझ्याबरोबर आहेत: राहुल कलाटे
‘मी महापालिकेत शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करतोय. मी शिवसेनेचा नगरसेवक आहे. मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. मला असं वाटत होतं की, याठिकाणी महाविकास आघाडी म्हणून विचार केला जाईल. कारण 2019 ला मी शिवसेना (Shiv Sena) बंडखोर म्हणून या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली. मला चिंचवडच्या जनेतेने भरभरुन प्रेम दिलं होतं. त्यावेळी मला 1 लाख 12 हजारांहून अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे त्यांनी माझ्यावर एक मोठा विश्वास दाखवला होता.’
‘सुनील शेळके जे स्वत:ला लोकनायक म्हणतात त्यांना जनतेची काय भावना समजली? मला सांगितलं जात होतं की, महाविकास आघाडी म्हणून लढूयात.. माझं तर काम आहे नेत्यांना भेटण्याचं. या निवडणुकीत शिवसैनिक हे माझ्याबरोबर आहेत.’ अशी प्रतिक्रिया राहुल कलाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
ADVERTISEMENT
‘मी शेवटपर्यंत चर्चा केली.. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण..’, पाहा अजित पवार काय म्हणाले.
‘पोटनिवडणुकीसाठी दोन जागा होत्या.. महाविकास आघाडीने एक जागा काँग्रेसला दिली. काँग्रेसने कसब्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली आहे. आज आम्ही काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असे आम्ही सगळ्यांनी जाऊन नाना काटे यांचा फॉर्म भरला आहे. दुसराही फॉर्म भरतायेत.. एकूण चार फॉर्म भरता येतात.’
ADVERTISEMENT
nana kate: चिंचवडमध्ये भाजपची ‘काटें’शी टक्कर! राष्ट्रवादीने केली घोषणा
‘या संदर्भात मी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इच्छुक होते त्यांच्याशी आणि इतर सर्वांशी चर्चा केली. ती चर्चा केल्यानंतर यातून मार्ग निघावा म्हणून बसलो होतो. पण दुर्दैवाने यात एकमत झालं नाही. सकाळी मी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. माझं बाळासाहेब थोरातांशी देखील बोलणं झालं पण बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे. मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सांगितलं की, अशाअशा पद्धतीने आज आम्ही काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष कदम, शिवसेनेचे भोसले, खरात मी आणि नाना काटे यांनी जाऊन फॉर्म भरतो. असं त्यांच्या कानावर घातलं. आता आम्ही फॉर्म भरला आहे.’
‘आमच्याकडे ज्यांनी-ज्यांनी उमेदवारी मागितलेली होती त्यांनी शांत राहावं हा आमचा प्रयत्न आम्ही चालू ठेवणार आहे. शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. राहुल कलाटेंना पण भेटण्यासाठी काही जण गेले होते. परंतु त्या संबंधात काय चर्चा झाली ते अद्याप मला समजू शकलेलं नाही.’
‘पंढरपूरची निवडणूक झाली ती पण लढली गेली, कोल्हापूरची निवडणूक झाली ती पण लढली गेली. देगलूरची निवडणूक पण लढली गेली. फक्त अपवाद आहे तो मुंबईचा. मुंबईची जी पोटनिवडणूक झाली त्यात आवाहन केल्यानंतर प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिली नाही. अशाप्रकारे पाहायला मिळालं. आम्ही सगळ्यांशी चर्चा करत होतं. त्यावेळेस सगळ्यांचं मत आलं की, ही निवडणूक लढवावी. त्यामुळे आम्ही आता फॉर्म भरलेला आहे.’
चिंचवड पोटनिवडणूक 2023 : NCP, BJP मधील ही नावं चर्चेत, कोण आहे इच्छुक?
‘मला मात्र उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं की, आपला आघाडीचा उमेदवार म्हणून नाना काटे यांना शिवसेनेचा पाठिंबा राहील. काँग्रेसने पण इथे पाठिंबा दिला आहे. कसब्यात आम्ही लोकं काँग्रेसला मदत करणार.’
‘निवडणूक लाइटली घेतली तर सोपी नाही. परंतु कष्ट घेतले, मेहनत घेतली तर निवडणूक अवघड पण नाही. माझ्या स्वत:ची राजकीय जीवनातील सुरुवातच पिंपरी-चिंचवड या भागातून झाली होती. माझी पाटी कोरी होती. अतिशय तरूण वयात मला उमेदवारी मिळालेली होती. मी त्या वेळेस देशात काँग्रेस पक्षामध्ये पहिल्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झालेलो होतो. तेव्हापासून या शहराचं आणि माझं नातं आहे.’
‘आम्ही पिंपरी-चिंचवडचा कायापालट केला. अनेक प्रकारचे प्रकल्प उभे करण्याचं आम्ही काम केलं. इथे राष्ट्रवादीला मानणारा मतदार आहे. इथे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मानणारा मतदार आहे. काँग्रेसच्या विचारांचा मतदार आहे. या सगळ्याचा विचार करता मी पण इथे लक्ष देणार आहे.’
‘मी शेवटपर्यंत सगळ्यांशी चर्चा केली, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जे 10 उमेदवार इच्छुक होते त्यांच्याशी पण चर्चा केली. राहुल कलाटेंशी पण मी उशिरापर्यंत बोललो. वेगवेगळे पर्याय दिले. त्यानंतर मी उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांशी बोललो आणि त्यातून चर्चा-विनिमय करुन अंतिम निर्णय झाला. त्यानंतर नाना काटेंची उमेदवारी जाहीर केली.’ असं म्हणत अजित पवारांनी चिंचवडमधील पोटनिवडणुकीबाबत नेमकी स्थिती काय आहे हे सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT