नागालँडमध्ये हिंसा : गोळीबारात सहा नागरिक ठार; सुरक्षा दलाची वाहनं पेटवली
नागालँडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नागरिक आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात संघर्ष होऊन हिंसक घटना घडली. नागालँडमधील मोन जिल्ह्यात असलेल्या ओटींगमध्ये ही घटना घडली असून, गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारताच्या पूर्वेकडील राज्य असलेल्या नागालँडमध्ये शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 6 नागरिक मरण पावले असल्याची माहिती समोर आली […]
ADVERTISEMENT
नागालँडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नागरिक आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात संघर्ष होऊन हिंसक घटना घडली. नागालँडमधील मोन जिल्ह्यात असलेल्या ओटींगमध्ये ही घटना घडली असून, गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
भारताच्या पूर्वेकडील राज्य असलेल्या नागालँडमध्ये शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 6 नागरिक मरण पावले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून 6 मृतदेह नागरिकांना मिळाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गोळाबाराची घटना घडल्यानंतरची काही छायाचित्रे समोर आली असून, यात आग लावण्यात आलेली वाहनं दिसत आहे. ही घटना नागालँडमधील मोन जिल्ह्यात असलेल्या ओटींगमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या. या घटनेवर नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
हे वाचलं का?
नागालँडचे मुख्यमंत्री नेफी रिओ यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री नेफी रिओ यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, ‘मोनमधील ओटींगमध्ये नागरिकांच्या हत्येची घटना दुर्दैवी असून, अत्यंत निंदनीय आहे. मी शोक संतप्त कुटुंबायाप्रती सहवेदना व्यक्त करतो आणि जखमी असलेल्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करतो. उच्चस्तरीय एसआयटी या घटनेची चौकशी करेल आणि देशात असलेल्या कायद्याप्रमाणे न्याय करेल. मी सर्वांनाच शांतता राखण्याचं आवाहन करतो.’
The unfortunate incident leading to killing of civilians at Oting, Mon is highly condemnable.Condolences to the bereaved families & speedy recovery of those injured. High level SIT will investigate & justice delivered as per the law of the land.Appeal for peace from all sections
— Neiphiu Rio (@Neiphiu_Rio) December 5, 2021
गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. ‘नागालँडमधील ओटींगमधील दुर्दैवी घटनेबद्दल दुःखी आहे. या घटनेत ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. शोक संतप्त कुटुंबियांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून नेमण्यात आलेली एसआयटी या घटनेची चौकशी करेल, असं शाह यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
घटना नेमकी काय?
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार मोन जिल्ह्यातील ओटींगमध्ये तिरू नावाचं गाव आहे. तिथे ही घटना घडली असून, गोळीबारात मरण पावलेले लोक एका पिकअप ट्रकमधून परत आपल्या गावी येत होते. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल (4 डिसेंबर) सायंकाळी 4 वाजताची ही घटना आहे. खूप वेळ गेल्यानंतरही लोक घरी न परतल्याने गावातील काही जण त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी त्यांचे मृतदेह गावकऱ्यांना मिळाले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा जवानांच्या गाड्या पेटवून दिल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT