School: Thackeray Govt चा मोठा निर्णय, 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करणार!
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्ष शाळा या बंदच आहेत. पण आता लवकरच शाळा सुरु होण्याच्या शक्यता आहेत. याबाबत राज्यातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने आठवी (8th class) ते बारावीचे (12th class)वर्ग भरविण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात येणार आहे. मात्र, असं असलं तरीही राज्यातील सर्वच […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्ष शाळा या बंदच आहेत. पण आता लवकरच शाळा सुरु होण्याच्या शक्यता आहेत. याबाबत राज्यातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने आठवी (8th class) ते बारावीचे (12th class)वर्ग भरविण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
मात्र, असं असलं तरीही राज्यातील सर्वच शाळांमध्ये सरसकट 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार नाहीत. शाळांमधील हे वर्ग सुरु करण्यासाठी देखील सरकारने काही नियम आखून दिले आहेत. त्यानुसार कोरोनामुक्त भागातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावाने शासनाने जो निर्णय जारी केला आहे त्या निर्णयाच्या आधारेच त्यांना आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करता येणार आहे.
सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी अनेक गावं ही कोरोनामुक्त झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अशा ग्रामीण भागातील शाळा या सुरु करता येणार आहे. पण असं असलं तरीही शाळा आणि महाविद्यालयांना पालकांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेता येणार आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयं जरी सुरु करण्यात आली तरीही कोरोनाचे सर्व नियम शाळा-महाविद्यालय प्रशासनाला काटेकोरपणे पाळावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घेणं हे संबंधित शाळेतील प्रशासनालाच करावं लागणार आहे.
मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलं नाही. मात्र, आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. ऑफलाइन शाळा भरणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याचा बराच फायदा होऊ शकतो.
ADVERTISEMENT
शाळा-महाविद्यालयांना कोणते नियम पाळावे लागणार?
ADVERTISEMENT
शाळा आणि महाविद्यालयं सुरु करताना तेथील प्रशासनाला अनेक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहेत. त्यानुसार एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा लागेल. तसंच दोन बाकांमध्ये किमान सहा फुटांचं अतंर ठेवावं लागेल. त्याशिवाय एका वर्गात कमाल 20 विद्यार्थीच बसविता येणार आहेत.
Digital India ची ऐशीतैशी ! गावात २० दिवस मोबाईलची रेंज गायब, ऑनलाईन शाळेसाठी मुलांना जावं लागतंय डोंगरावर
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करणं अनिवार्य असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांनी मास्क परिधान करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. या सगळ्या नियमांचं पालन करुनच राज्यातील शाळा सुरु होणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT