पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पहाव्यात – खासदार नवनीत राणांचा टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याचसोबत विदर्भात अकोला, अमरावती या भागातही पावसाने पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची खासदार नवनीत राणा यांना पाहणी केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झालेले पहायला मिळाले. पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्याही समस्या पहाव्यात असा टोला नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत शेतीचं नुकसान झालंय. याचसोबत अनेक राहत्या घरांचंही या पावसाने नुकसान केलंय. नदी-नाले तुडुंब भरुन वाहत असून पाऊस उसंत घेत नसल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. लोकसभेचं कामकाज आटपून अमरावतीत परतलेल्या नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली आहे. यावेळी नवनीत राणा यांनी भर चिखलातुन पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले.

हे वाचलं का?

यावेळी बोलत असताना नवनीत राणांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “गाडी चालवत पंढरपूरला जाणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भाची पावसाने झालेली परिस्थिती पहावी. स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत विदर्भातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जो पर्यंत अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाहीत तर तुम्हाला कळणार कसं, मदत कशी दिली जाणार? असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

ADVERTISEMENT

Flood in Maharashtra : ‘पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना अन्न-धान्याचे मोफत वाटप होणार’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT