मोदींच्या पुणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती, शिवसेनेकडून ‘हे’ नेते लावणार हजेरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पाच किलोमीटरच्या मार्गाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय. पंतप्रधान कोणत्याही राज्यात दौऱ्यावर असताना त्या राज्याचे मुख्यमंत्रीही कार्यक्रमात सहभागी होतात. परंतू पुणे दौऱ्यात शिवसेनेकडून सुभाष देसाई हे कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना याबद्दल माहिती दिली.

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यात, महापालिकेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ते अनावरण करणार आहेत. या दौऱ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी होणार आहेत. पुणे शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस मात्र मोदींच्या दौऱ्याच्या विरोधात आंदोलन करणार असून त्यांना काळे झेंडे दाखविणार आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आजारपणामुळे अद्याप लांबच्या प्रवासाची मान्यता मिळाली नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याचं समोर येतं आहे.

PM Modi : मेट्रोचं उद्घाटन ते सुवर्ण महोत्सवी सोहळा… असा आहे पंतप्रधान मोदींचा दौरा

हे वाचलं का?

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद हे आता जगजाहीर झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी मराठा आऱक्षणाच्या विषयावर उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. परंतू त्यानंतर उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे ते सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं टाळत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. परंतू उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्यामुळे चर्चेच गुऱ्हाळ आता शांत झालं आहे.

दरम्यान, अजित दादांनी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका मांडली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी सरकार म्हणून ज्या गोष्टी करायला हव्यात त्या आम्ही केल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने आपल्या निवडणुका पुढे ढकलल्या, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ओबीसींसाठीचा डेटा ३ ते ४ महिन्यात गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही नवा आयोग नेमणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिल्या आहेत.नवीन अध्यक्ष नेमून पुन्हा काम सुरू करणार आहोत, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT