मैं झुकेगा नही…म्हणणाऱ्या चंद्रभागा आजींना उद्धव ठाकरे म्हणतात, तुम्ही अजुनही युवासेनेत !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

नवनीत आणि रवी राणा यांच्याविरुद्ध मातोश्रीबाहेर आंदोलनस्थळी गर्दी केलेल्या शिवसैनिकांमध्ये उपस्थित असलेल्या आजी चंद्रभागा शिंदे यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे वाचलं का?

80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी भेट घेत त्यांची विचारपूस केली होती.

ADVERTISEMENT

यानंतर रविवारी उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह परळ मध्ये चंद्रभागा शिंदे यांच्या घरी त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता उद्धव ठाकरे आंदोलनस्थळी उपस्थित राहिलेल्या चंद्रभागा शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली.

यावेळी चंद्रभागाबाईंनी उद्धव ठाकरेंना आशिर्वाद देताना, साहेब घाबरु नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. मुंबईत शिवसेनाच येणार असा आशिर्वाद दिला.

खुद्द मुख्यमंत्री सहकुटुंब आणि सहपरिवार आपल्या घरी आल्यामुळे चंद्रभागाबाईंच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.

उद्धव ठाकरेंनीही चंद्रभागा आजींच्या पाया पडत, तुमचं वय झालेलं असलं तरीही तुमचा उत्साह पाहून तुम्ही युवासेनेत आहात असं वाटतं, असं म्हटलं.

यावेळी औपचारिक गप्पा झाल्यानंतर सर्व शिंदे कुटुंबांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटोसेशन केलं.

तुमच्यासारख्या शिवसैनिकांमुळेच आम्ही आहोत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रभागाबाई आणि त्यांच्या परिवाराचे आभार मानले

आपल्या भेटीची अखेर रश्मी ठाकरेंनी चंद्रभागा आजींना पेढा भरवत केली.

यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेही उपस्थित होते. भेटीनंतर उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे. वाचा सविस्तर बातमी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT