सगळ्यात मोठी ब्रेकींग न्यूज: रश्मी ठाकरेंच्या भावाची संपत्ती ED कडून जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुबंई: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. ज्यामुळे आता राज्यातील राजकारण अधिकच तापणार आहे. कारण अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

ADVERTISEMENT

ईडीने नुकतंच एक प्रेस रिलीज काढलं आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची तब्बल 6.45 कोटीची संपत्ती जप्त केली आहे. याचा अर्थ या संपत्तीबाबत कोणत्याही प्रकारे व्यवहार श्रीधर पाटणकर करु शकणार नाहीत असं ईडीचं म्हणणं आहे. जी केस होती ईडी होती ती पुष्पक बुलियन नावाची कंपनी आहे त्या संदर्भातील ही केस होती. त्याच संदर्भात 11 फ्लॅट्स ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील फ्लॅट्स जप्त केले आहेत.

हे फ्लॅट्स श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड नावाची कंपनी होती त्यांचे हे फ्लॅट होते. ईडीचं असं म्हणणं आहे. ही कंपनी श्रीधर पाटणकर हेच चालवतात. ही त्यांची कंपनी आहे म्हणजेच त्यांच्या मालकीची कंपनी आहे.

हे वाचलं का?

ही जी कपंनी आहे यासंदर्भात आम्ही जी आरओसी ज्याला म्हणतात रजिस्टर्ड ऑफ डॉक्यूमेंट जी असतात केंद्र सरकारकडे ते आम्ही तपासून पाहिलं त्यावेळी त्याच्या संचालकांमध्ये कुठल्याही पद्धतीने श्रीधर पाटणकर यांचं नाव आढळून आलं नाही. पण ईडीच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्यामार्फत चालवली जाते.

श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावर लावलेल्या आरोपांबाबत देखील स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात ते प्रकरण वेगळं होतं.

ADVERTISEMENT

मात्र आता हे जे प्रकरण आहे यात ईडीने 11 फ्लॅट जप्त केले आहेत. जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण काय आहे:

ADVERTISEMENT

पुष्पक बुलियन या केसमध्ये 6.45 कोटी संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ही केस मार्च 2017 साली नोटाबंदीनंतर पुष्पक बुलियन नावाच्या एका कंपनीवर केला होता आणि त्यात तपास करताना असं आढळून आलं की, नंदकिशोर चतुर्वेदी हा एक खूप मोठा हवाला ऑपरेटर आहे. त्याच्याकडूनच जी एंट्री प्रोव्हाइड करण्यात आली होती पुष्पक रियालिटी डेव्हलपर यांना 20 कोटी रुपयांसाठी त्याने एंट्री प्रोव्हाइड केली होती.

म्हणजेच त्याने पुष्पक रियालिटी यांना रिसीट दिली, बिलं दिली, invoice दिले. त्यासाठी 20 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले आणि त्याऐवजी 20 कोटी कॅश नंदकिशोर चतुर्वेदीने यांना दिलं असावं असं तपासात समोर आलं आहे.

त्यानंतर चतुर्वेदी याने बरचशा शेल कंपनी आहेत त्यांच्याकडून लेअरिंग करुन ते पैसे दुसऱ्या जागी फिरवले. चतुर्वेदी याच्या खूप साऱ्या शेल कंपनी आहेत. त्यात एक हमसफर डिलर प्रा. लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीने एक अनसिक्युरर्ड लोन 30 कोटी रुपयांचं श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड ही तीच कंपनी आहे जी श्रीधर माधव पाटणकर यांची कंपनी आहे. असं ईडीचं म्हणण आहे.

यात असं दिसून येतं की, हवाला मार्गाने हे 30 कोटी रुपये अनसिक्युरर्ड लोन दाखवून श्री साईबाब गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड या कंपनीला दिले गेले. त्यासाठी ईडीने काही जागांवर सर्च देखील केलं होतं. नंदकिशोर चतुर्वेदी ही व्यक्ती काही अद्याप सापडलेली नाही अजून. हे समोर आल्यानंतर आता हे समजून येतं की, जे पैसे साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला दिले होते तोच पैसा महेश पटेल, नंदकिशोर चतुर्वेदी यांनी रियल इस्टेट प्रोजेक्टमध्ये जो निलांबरी प्रोजेक्ट आहे किंवा साईबाब गृहनिर्मिती यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्यात गुंतवले.

हवाला मार्फत जे पैसे आले होते तेच पैसे त्यांनी गुंतवले होते. त्यात साईबाब गृहनिर्मिती कंपनीचा रोल समोर आल्याने आता 6.45 रुपये किंमतीचे 11 फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT