लॉकडाउन लावू नका सांगणाऱ्या आनंद महिंद्रांना मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई तक

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेशी संवाद साधला. लॉकडाउन लावण्याची माझी इच्छा नाही, परंतू वाढती रुग्णसंख्या पाहता मला दुसरा पर्याय मिळाला नाही तर पूर्णपणे लॉकडाउन लावलं जाईल असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. राज्यात मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध लादले जात आहेत. पुण्यात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेशी संवाद साधला. लॉकडाउन लावण्याची माझी इच्छा नाही, परंतू वाढती रुग्णसंख्या पाहता मला दुसरा पर्याय मिळाला नाही तर पूर्णपणे लॉकडाउन लावलं जाईल असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. राज्यात मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध लादले जात आहेत. पुण्यात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतू लॉकडाउन लावल्यास अर्थव्यवस्थेला आणि सामान्य माणसाला होणारं नुकसान लक्षात घेता अनेक जणांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला होता.

मास्क न लावण्यावरुन मुख्यमंत्री संतापले, नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं!

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लॉकडाउन लावू नका अशी विनंती केली होती. “लॉकडाउन लावलं तर छोटे-मोठे उद्योगधंदे, गरीब लोकं आणि कामगार यांना फटका बसेल. सर्वात आधी जे लॉकडाउन लावण्यात आलं ते आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी करण्यात आलं, आपण त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं.”

शुक्रवारी जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आनंद महिंद्रांच्या या प्रस्तावावर आपली प्रतिक्रिया दिली. जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री?

“एका उद्योगपतीने सांगितलं आहे की लॉकडाउन लावू नका त्याऐवजी आरोग्य व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्या. मुद्दा असा येतो की हे जे सल्ले देणारी लोकं आहेत त्यांना मी हात जोडून सांगतो…सगळ्या उद्योगपतींना नाही, ज्यांनी मला लॉकडाउन लावू नका असा सल्ला दिला आहे त्यांना मी सांगू इच्छितो, की आरोग्य व्यवस्था, बेड्स सगळं काही वाढवतो पण मला रोज राज्यात किमान ५० डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी मिळतील अशी काहीतरी सोय करुन द्या. आरोग्य सुविधा म्हणजे फर्निचरचं दुकान नाहीये. व्हेंटीलेटर आलं की ते वापरणारी तज्ज्ञ लोकं लागतात. ऑक्सिजन किती द्यायचं किती नाही द्यायचं हे पाहणारी सुद्धा लोकं लागतात. इतकच काय इंजेक्शन कशी दिली पाहिजेत हे योग्य पद्धतीने समजणारा डॉक्टर लागतो…ही तज्ज्ञ लोकं आणि डॉक्टर कुठून आणायची?”

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे:

  • कुणी मला व्हिलन ठरवलं तरी चालेल. पण मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे. जनतेच्या जीवाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी जीव वाचवण्याचा विचार करणार.

  • लष्कराच्या धर्तीवर आपण आपल्या महाराष्ट्रात फिल्ड हॉस्पिटल उभारले आहेत

  • महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडली नाही तर पुढील 15 दिवसात आरोग्य सुविधा पुरणार नाही.

    • आरोग्य सुविधा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेड्स, आयसीयू आणि व्हेंटिलेटर वाढवले जात आहेत. पण असं असलं तरीही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी हे आपण कसे वाढवणार आहोत?

    • लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असं पण लसीमुळे त्याची घातकता कमी होईल. असं स्वत: पंतप्रधान मोदींनी मला सांगितलं आहे.

    • येत्या काही एक-दोन दिवसात मी अनेक लोकांशी बोलणार आहे. काही कडक निर्बंध लावावे लागतील ते उद्या-परवा मी जाहीर करणार आहे.

    CM उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे..

    • सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो की, यात राजकारण करु नका

    • आपल्याला कोरोनावर मात करायची आहे.

    • पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण लॉकडाऊन जाहीर करत नाहीए.

    • आपण आता देखील लॉकडाऊन टाळू शकतो. फक्त आपल्या सहकार्याची आणि पूर्वी जी जिद्द होती ती दाखवणं गरजेचं आहे.

    • पुन्हा एकदा आपल्याला सर्व सणांवर बंदी घालावी लागेल.

    Lockdown ची शक्यता अद्यापही टळलेली नाही-उद्धव ठाकरे

    हे वाचलं का?

      follow whatsapp