Mohan Bhagwat: जात आणि वर्ण व्यवस्था हा भूतकाळ, तो विसरून गेला पाहिजे
जात आणि वर्ण व्यवस्था हा भूतकाळ आहे तो विसरून गेला पाहिजे असं महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये केलं आहे. वर्ण-जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्यांच्यात आधी विषमता नव्हती वगैरे सगळं ठीक आहे. पण आज जर कुणी विचारलं की वर्ण-जातींबद्दल काय? तर तो एक भूतकाळ आहे हेच प्रत्येकाने विसरलं पाहिजे. “सरसंघचालक […]
ADVERTISEMENT

जात आणि वर्ण व्यवस्था हा भूतकाळ आहे तो विसरून गेला पाहिजे असं महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये केलं आहे. वर्ण-जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्यांच्यात आधी विषमता नव्हती वगैरे सगळं ठीक आहे. पण आज जर कुणी विचारलं की वर्ण-जातींबद्दल काय? तर तो एक भूतकाळ आहे हेच प्रत्येकाने विसरलं पाहिजे.
“सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषीसारखे” इमाम इलियासींचं वक्तव्य
नेमकं काय म्हणाले आहेत मोहन भागवत?
जाती आणि वर्णव्यवस्था आत्ताची गरज आहे का? हे जर कुणी विचारलं तर प्रत्येकाने तो आता भूतकाळ आहे आपण तो विसरून गेलं पाहिजे असंच उत्तर दिलं पाहिजे. ज्या कुठल्याही धोरणामुळे भेदाभेद निर्माण होतो असं धोरण, अशी व्यवस्था ही विसरली गेली पाहिजे. आपण काय केलं तर याचं समर्थन करत आलो. त्यासाठी हे पुरावे दिले. शास्त्र तर आहे, विद्वान लोकं काही खोटं बोललेले नाहीत.
आपल्याला देण्यात आलेली प्रमाणं चुकीची नाहीत
वंशशास्त्राचं, जीवशास्त्राचं, समाज विज्ञानाचं जे ज्ञान आज आपल्याला आहे ते त्या काळी नव्हतं त्याकाळातली प्रमाणं आपल्या विद्वानांनी दिली आहेत. ती चुकीची नाहीत. कारण वस्तुस्थिती पाहिली तर लक्षात येतं की ही सगळी प्रमाणं हिंदू वैदिक सनातन धर्मातली आहेत. सगळे ग्रंथ धुंडाळून दिली आहेत. ही प्रमाणं भेदांच्या विरूद्ध बोलणारे सगळे आपण आदर्श मानतो असे सगळे लोक आहेत.