Punjab Election : राहुल गांधी प्रचाराचा नारळ फोडणार, 117 उमेदवारांसह सुवर्ण मंदिरात होणार नतमस्तक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आजचा मुहूर्त निवडला आहे. आज ते अमृतसर, जालंधर दौऱ्यावर असणार आहेत. या दरम्यान ते आपल्या 117 उमेदवारांसह सुवर्ण मंदिरातही नतमस्तक होतील आणि लंगर सेवेतही सहभागी होतील. पंजाबमध्ये नेतृत्व बदल झाल्यानंतर राहुल गांधींचा हा पहिला दौरा आहे.

ADVERTISEMENT

राहुल गांधी हे सकाळी अमृतसर विमानतळावर उतरतील. त्यानंतर दरबार साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिरात जातील. त्यानंतर 117 उमेदवारांसह लंगर सेवेत सहभागी होतील. त्यानंतर बसमध्ये जाऊन दुर्गयाणा मंदिर आणि भगवान वाल्मिकी तीर्थ स्थळ या ठिकाणी पोहचतील. अमृतसरनंतर रस्ते मार्गाने राहुल गांधी १०० किमी दूर असलेल्या जालंधर या ठिकाणी जातील. नवी सोच-नवा पंजाब नावाच्या व्हर्चुअल सभेला ते संबोधित करतील. पंजाबसह इतर पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत मात्र 31 जानेवारीपर्यंत सभा, रॅली, रोड शो यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर १० मार्चला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आज राहुल गांधी जालंधरमध्ये होणाऱ्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी मोठ्या प्रमाणावर आहे. नवजोत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा आणि निवडणूक प्रभारी सुनील जाखड हे सगळेही राहुल गांधींसोबत असणार आहेत. मात्र कोरोना संकट लक्षात घेता मर्यादित स्वरूपात हा दौरा असणार आहे.

हे वाचलं का?

राहुल गांधी यांच्या या पंजाब दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी आणि व्यवस्था अमृतसरचे खासदार गुरजीत सिंग औजला यांच्याकडे आहे. राहुल गांधींना हे वाटतं आहे की प्रत्येक उमेदवाराने त्यांचं अभियान सुरू करावं आणि त्याची सुरूवात हरमंदिर साहिबपासून करावी असंही औजला यांनी आज तकशी बोलताना स्पष्ट केलं. आता जालंधर या ठिकाणी राहुल गांधी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे. काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळे जो त्यांच्या निर्णय असेल त्यानुसारच पक्षाचं धोरण ठरेल. सामूहिक नेतृत्व निर्णय घेईल. पक्षातल्या लोकांना वाटत असेल की निवडणुकीसाठी एक चेहरा असला पाहिजे तर तसा निर्णय घेतला जाईल असं म्हणत औजला यांनी काँग्रेसमधल्या निवड पद्धतीवरही भाष्य केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT