काँग्रेसचा नेता ‘मोदींची हत्या करण्यासाठी तयार रहा’ म्हणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. राजा पटेरियांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते संविधान वाचवण्याबाबत बोलत आहेत. पण दुसऱ्याच क्षणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबद्दल बोलतात. पटेरियांच्या या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. राजा पटेरिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत.

ADVERTISEMENT

व्हायरल व्हिडिओमध्ये पटेरिया काय म्हणत आहेत?

“हे मोदी निवडणुका संपवतील. मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे भविष्यातील जीवन धोक्यात आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींची हत्या करायला तयार व्हा. हत्या म्हणजे हरवायला.”, असं बोलताना ते दिसत आहेत.

हे वाचलं का?

मी गांधींच्या विचारांवर चालणारा : पटेरिया

हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर राजा पटेरियायांनी स्पष्टीकरण दिले आहे. व्हिडीओ एडिट करण्यात आला असून व्हिडिओमध्ये जे काही चालले आहे ते त्याला अभिप्रेत नव्हते, असा दावा त्यांनी केला. इंडिया टुडेशी संवाद साधताना पेट्रिया म्हणाले की, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. पुढच्या निवडणुकीत मोदींचा पराभव करायचा, असा त्याचा अर्थ आहे. बोलण्याच्या ओघात तो शब्द गेला. परंतु त्याला चुकीच्या पद्धतीने समोर आणलं गेलं आहे, असं पटेरिया म्हणाले.

“मी गांधींना मानणारा माणूस आहे. गांधींना मानणारा माणूस खुनाबद्दल बोलू शकत नाही. व्हिडिओ चुकीचा मांडला गेला आहे. राजकीय निवडणुकीच्या मैदानात पराभूत करून या देशाचे संविधान वाचवा, असे मला म्हणायचे होते. दलित, इ. आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी मोदींचा पराभव करणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

मध्य प्रदेशचे गृहमंत्र्यांचे SP ना निर्देश

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पन्ना एसपी यांना राजा पटेरिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नरोत्तम मिश्रा म्हणाले, “मी पटरियाजींचे विधान ऐकले. यावरून हे स्पष्ट होते की ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही. स्वातंत्र्यानंतर त्यांनीच ती संपवली. ही इटलीची काँग्रेस आहे. आणि इटलीची मानसिकता मुसोलिनीचीच आहे. स्वरा भास्कर, कन्हैया कुमार आणि सुशांत जी त्यांच्या यात्रेत चालत आहेत, हे याच्यावरून स्पष्ट होत आहे, असं मिश्रा म्हणाले. राजा पटेरिया मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. सध्या ते मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT