मलाही अटक करा, लसीकरणाबद्दल प्रश्न विचारत राहुल गांधींचं नरेंद्र मोदींना आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना लसीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या देशात सध्या अनेक राज्यांत लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने भारतात तयार झालेल्या लसींचे काही डोस बाहेरील देशांना मदतीच्या स्वरुपात पाठवले. केंद्र सरकारच्या या नितीला प्रश्न विचारणारे पोस्टर्स दिल्लीत काही ठिकाणी उभारण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी याविरोधात कारवाई करत गुन्ह्याची नोंद करत १७ जणांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

मोदीची आमच्या मुलांसाठीची लस विदेशात का दिलीत? असा प्रश्न विचारत पोस्टर्स उभारणाऱ्या लोकांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हे पोस्टर ठेवत मोदी सरकारला आता मलाही अटक करा असं आव्हान दिलं आहे.

हे वाचलं का?

राहुल गांधींनी हे पोस्टर ठेवल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही आपला ट्विटरवरचा प्रोफाईल पिक्चर बदलत मोदींना आव्हान दिलं आहे.

देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे. लस उपलब्ध होत नसल्यामुळेच अनेक राज्यांनी १ मे पासून सुरु झालेलं १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण थांबवलं आहे. मुंबईसारख्या शहरात आजही अनेक केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत देशातील लसीच्या साठ्यावरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT