मुंबई-गोवा महामार्गाचं काम दर्जेदार नाही, रस्ता मानवी वापरास निकृष्ट- कोर्ट कमिशनरचा अहवाल

मुंबई तक

– मेहबूब जामदार, रायगड प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गा असो किंवा मग मुंबई-पुणे महामार्गा राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल अनेकदा बातम्या आपण वाचल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताना अनेकदा रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोर्ट कमिशनरने आपला पाहणी अहवाल सादर केला असून या रस्त्याचं काम हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

– मेहबूब जामदार, रायगड प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गा असो किंवा मग मुंबई-पुणे महामार्गा राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल अनेकदा बातम्या आपण वाचल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताना अनेकदा रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोर्ट कमिशनरने आपला पाहणी अहवाल सादर केला असून या रस्त्याचं काम हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालेलं नसल्याचा शेरा आपल्या अहवालात दिला आहे. इतकच नव्हे तर हा रस्ता मानवी वापरास निकृष्ट असल्याचही कमिशनरने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

मुंबई गोवा NHAI 66 महामार्गावरील पळस्पे ते पोलादपूर हा १४० किमी अंतरापैकी पाच किमीचा रस्ताही सुस्थितीत नाही. या रस्त्यांच काम हे ड्रॉईंग आणि नकाशानुसार झालेलं नाही त्यामुळे हा रस्ता मानवी वापरास निकृष्ट असुन रस्त्याचे कामकाज दर्जेदार व गुणवत्तापूर्ण नाही असा निष्कर्ष कोर्ट कमिशनरने न्यायालयाकडे नोंदवला आहे.

अलिबाग न्यायालयात सादर केलेल्या अहवालात कोर्ट कमिशनरने निकृष्ट कामासोबत ठेकेदार, नॅशनल हायवे अधिकारी यांच्यावरही अहवालात ताशेरे ओढलेले आहेत. याबाबत आमचे म्हणणे न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती याचिकाकर्ते अँड अजय उपाध्ये यांनी दिली आहे. त्यामुळे सादर केलेल्या अहवालावर आता न्यायालयात वादी, प्रतिवादी याचा युक्तिवाद होऊन त्यावर काय निर्णय न्यायालय देणार याकडे लक्ष लागले आहे.